कोकण रेल्वेमधून गांजाची तस्करी

अल्पवयीन मुलाकडून ८ किलो गांजा कह्यात 

प्रतिकात्मक छायाचित्र

मडगाव, २० मार्च (वार्ता.) – कोकण रेल्वेमधून गांजाची तस्करी केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. कोकण रेल्वे पोलिसांनी २० मार्च या दिवशी एका १५ वर्षीय मुलाकडून ८ किलो १८४ ग्रॅम (बाजार मूल्य ८ लाख १८ सहस्र रुपये) गांजा कह्यात घेतला आहे. मडगाव रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक ६ वर ही कारवाई करण्यात आली आहे.

संशयित मुलगा फलाटावर उभा होता. पोलिसांनी मुलाच्या संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून अन्वेषण केले असता त्यांना त्याच्याकडे गांजा आढळून आला. पोलिसांनी त्वरित कारवाई करत संबंधित अल्पवयीन मुलाला कह्यात घेतले. या प्रकरणी अमली पदार्थविरोधी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे आणि संशयित अल्पवयीन मुलाची ‘अपना घर’ येथे रवानगी करण्यात आली आहे. कोकण रेल्वे पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील गुडलर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विप्लव वस्त या प्रकरणी अधिक अन्वेषण करत आहेत.