
ठाणे, २० मार्च (वार्ता.) – ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात मागील काही दिवसांपासून कचरा उचलला जात नसल्यामुळे कचर्याचे ढीग साचले आहेत. याच्याच निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने ठाणे महापालिकेच्या मुख्यालयासमोर १९ मार्चला कचरा टाकून आंदोलन केले होते. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी २० मार्चला महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर धरणे धरत ढोल वाजवून आंदोलन केले. ठाणे येथील सीपी तलाव परिसरातील कचरा हस्तांतरण केंद्रावर कचर्यामुळे दुर्गंधी पसरत असून आग लागून परिसरात धूर पसरत आहे. यामुळे स्थानिकांसह शिवसेनेने येथे कचरा टाकण्यास विरोध केला आहे. आंदोलनानंतर ठाणे महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन देण्यात आले.