हप्ता घेणारे कल्याण येथील फेरीवाला हटाव विभागाचे पथकप्रमुख निलंबित !

ठाणे, २० मार्च (वार्ता.) – डोंबिवली-महापालिकेच्या कल्याण पूर्व येथील जे प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील पथकप्रमुख भगवान काळू पाटील यांना आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी महानगरपालिकेच्या सेवेतून निलंबित केले. मागील आठवड्यात फेरीवाल्यांच्या मध्यस्थाकडून फेरीवाल्यांवर कारवाई न करण्यासाठी भगवान पाटील हप्ता घेतांनाचे चित्रीकरण एका भ्रमणभाष संचाच्या कॅमेर्‍यात करण्यात आले. ही चित्रफीत सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाली होती. (कायद्याचे भय वाटत नसल्यामुळेच अधिकारी असे कृत्य करण्याचे धाडस करत आहेत. – संपादक) त्यानंतर वरील कारवाई करण्यात आली.