प्रशासक नेमण्याचा निर्णय मागे न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडू ! – गुरुप्रसाद गौडा, प्रवक्ते, देवस्थान आणि धार्मिक संस्था महासंघ, कर्नाटक

या संदर्भात ५ मार्च या दिवशी महासंघ आणि बेळगावमधील मंदिर विश्‍वस्त समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेचा संक्षिप्त वृत्तांत …..

१० ते १२ मार्च या कालावधीत श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरात संचारबंदी !

महाशिवरात्रीनिमित्त प्रतिवर्षी श्री क्षेत्र भीमाशंकर येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते; मात्र यंदा कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा धोका विचारात घेऊन प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे.

भारताच्या लसीला परदेशातूनही मान्यता

कोव्हॅक्सीन लसीला मान्यता देणारा झिम्बाब्वे हा जगातील पहिला देश ठरला आहे.

७ मार्च या दिवशी स्वित्झर्लंडमध्ये बुरखा बंदीसाठी सार्वमत घेतले जाणार !

स्वित्झर्लंडमध्ये सार्वजनिक ठिकाणी बुरखा वापरण्यावर बंदी घालण्याची सिद्धता केली जात आहे. यासंदर्भात ७ मार्च या दिवशी देशात सार्वमत घेतले जात आहे.

(म्हणे) ‘मोदी सरकार आल्यापासून भारतात लोकांना मिळणारे स्वतंत्र्य घटले !’ – अमेरिकेतील ‘ग्लोबल फ्रीडम हाऊस’चा अहवाल

अमेरिकेत वर्णद्वेषी आक्रमणांमध्ये दिवसेंदिवस वाढत होत असतांना या अमेरिकी संस्थेने प्रथम तेथील लोकांच्या स्वातंत्र्याची काळजी घ्यावी. भारतात कुणाला किती स्वातंत्र्या द्यायचे, याची काळजी घ्यायला भारतीय समर्थ आहेत !

ओटीटी मंचावरून अश्‍लील साहित्य प्रसारित होत असल्याने प्रत्येक साहित्याचे परिनिरीक्षण झाले पाहिजे ! – सर्वोच्च न्यायालय  

हे न्यायालयाला का सांगावे लागते ? सरकारला कळत नाही का ? गेले अनेक मास विविध संघटना अशीच मागणी करत आहेत. त्यामुळे सरकारने उशिराने का होईना याविषयी नियमावली बनवली आहे; मात्र त्यामुळे असे करणार्‍यांना कठोर शिक्षा होईल का ?

मदरशांमध्येही शिकवले जाणार रामायण, गीता आणि योग !

ओपन एज्यूकेशनच्या अंतर्गत विद्यार्थी याची निवड करण्यासाठी स्वतंत्र असतील. हे अनिवार्य नाही.

अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात गुरुप्रतिपदा उत्सव साध्या पद्धतीने साजरा !

राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पहाता मंदिरातील महाराजांची नित्य पूजा, आरती वगळता सर्व धार्मिक कार्यक्रम आणि भाविकांच्या वतीने होणारे पूजा-विधी अजूनही बंदच आहेत.

वर्ष २०२० मध्ये महापालिका क्षेत्रात जगले २३ सहस्र वृक्ष ! – सांगली महापालिका आयुक्त

हे वृक्ष लावतांना ६ फुटांपेक्षा अधिक उंची आणि २ वर्षे देखभाल या अटींवरच वृक्षारोपणाचे काम संबंधितांना देण्यात आले होते. त्यामुळे ९० टक्के झाडे जगवण्यात महापालिका प्रशासनाला यश आले आहे.

तेलंगाणामध्येही वीजपुरवठा खंडित करण्याचा चीनचा प्रयत्न दक्षतेमुळे फसला !

चीनच्या आक्रमणाला भारताने प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे, अन्यथा तो पुनःपुन्हा अशी आक्रमणे करून भारताला वेठीस धरू शकतो !