महापालिकेच्या आरोग्य केंद्रात महिलादिनी केवळ महिलांचे लसीकरण ! – नितीन कापडणीस, आयुक्त, सांगली महापालिका

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ८ मार्च या दिवशी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या २ आरोग्य केंद्रात केवळ महिलांसाठी कोरोना लसीकरण केले जाणार आहे

अमरनाथ यात्रेच्या काळात विनामूल्य लंगर चालवणार्‍या हिंदूंसाठी प्रशासनाकडून कठोर नियमावली !

हिंदूंच्या विरोधात होणार्‍या दुष्कृत्यांच्या विरोधात कठोर कायदे न करणारे हिंदूंच्या धार्मिक यात्रेसाठी मात्र कठोर नियमावली बनवतात, हे संतापजनक होय ! ‘हिंदूंच्याच धार्मिक यात्रेमध्ये अन्य धर्मियांची हॉटेल्स का आहेत ?’ असा प्रश्‍न उपस्थित होतो !

कराड येथे २२ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर जाहीर केलेल्या संचारबंदीचा नियम भंग करणार्‍या २२ जणांवर कराड पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली.

श्रीराममंदिरासाठी आवश्यकतेपेक्षा दुप्पट रक्कम गोळा झाल्याने घरोघरी जाऊन देणगी गोळा करणे बंद !

मंदिराला लागणार्‍या पैशांपेक्षा अधिक गोळा झालेल्या रकमेचा व्यय देशातील जीर्णावस्थेत असलेल्या प्राचीन आणि मोठ्या मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी करावा, तसेच हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी धर्मशिक्षण देणारी केंद्रे उघडावीत, असेच हिंदूंना वाटते !

मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्याकडून जनतेला त्रास झाल्यास खपवून घेणार नाही ! – आमदार वैभव नाईक

शासनस्तरावर प्रतिवर्षी भ्रष्टाचार निर्मूलनाविषयी केले जाणारे प्रयत्न किती तकलादू आहेत, हे लक्षात येते, तसेच प्रतिवर्षी शासकीय कार्यालयातून दिली जाणारी भ्रष्टाचार निर्मूलनाविषयीची शपथ, हाही एक ‘फार्स’ असल्याचे स्पष्ट होते !

कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातून पसार झाल्याचा संशय असलेले बंदीवान कारागृह परिसरातच सापडले

कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातून ५ मार्च या दिवशी सायंकाळी पलायन केल्याचा संशय असलेले दोघे कैदी (बंदीवान) उपेंद्र नाईक आणि हुसेन कोयडे या दोघांना ५ मार्चला मध्यरात्री ३.३०च्या सुमारास कह्यात घेण्यात आले.

मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात पुणे येथे गुन्हा नोंद !

चोराच्या उलट्या बोंबा ! हज हाऊसमध्ये देशद्रोही कारवाया होत असल्याचे यापूर्वी सिद्ध झालेले असतांना कोणी ही वस्तूस्थिती उघड करत असेल तर ते चूक कसे ?

‘ओसीआय’ कार्डधारकांना तबलिगी किंवा मिशनरी यांसंदर्भात भारतात कार्य करायचे असल्यास अनुमती आवश्यक ! – केंद्र सरकारचा नवा नियम

ओसीआय कार्डधारक विदेशी नागरिकांना भारतात तबलिगी, मिशनरी अथवा पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्य करायचे असल्यास त्यांना ‘फॉरेन रिजनल रजिस्टे्रशन ऑफीस’कडून विशेष अनुमती घ्यावी लागणार !

सातारा जिल्ह्यातील वाई आणि फलटण तालुक्यात घरफोडी !

वाढत्या चोरीच्या घटना पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करतात !

सांगली महापालिकेचे ७१० कोटी रुपयांचे आणि ४३ लाख रुपये शिलकीचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर !

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगली महापालिकेचे वर्ष २०२१ साठीचे अंदाजपत्रक ३ मार्च या दिवशी स्थायी समितीला सादर केले.