तेलंगाणामध्येही वीजपुरवठा खंडित करण्याचा चीनचा प्रयत्न दक्षतेमुळे फसला !

चीनच्या या आक्रमणाला भारताने प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे, अन्यथा तो पुनःपुन्हा अशी आक्रमणे करून भारताला वेठीस धरू शकतो !

भाग्यनगर (तेलंगाणा) – मुंबईमध्ये गेल्यावर्षी १२ ऑक्टोबरला खंडित झालेल्या वीजपुरवठ्याच्या मागे चीनच्या हॅकर्स हात असल्याचे उघड झाल्यानंतर आता तेलंगाणामध्येही चीनच्या हॅकर्सकडून असाच प्रयत्न करण्यात आला होता; मात्र ‘कंप्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ऑफ इंडिया’च्या दक्षतेमुळे तो अयशस्वी ठरल्याचे समोर आले आहे.

चिनी हॅकर्सनी तेलंगाणातील टी.एस्. ट्रांस्को आणि टी.एस्. गेनको या २ पॉवर यंत्रणा हॅक करण्याचा प्रयत्न केला होता. या दोन्ही तेलंगणातील प्रमुख वीजपुरवठा करणार्‍या यंत्रणा आहेत.