वर्ष २०२० मध्ये महापालिका क्षेत्रात जगले २३ सहस्र वृक्ष ! – सांगली महापालिका आयुक्त

आयुक्त नितीन कापडणीस

सांगली, ३ मार्च – वर्ष २०२० मध्ये सांगली महापालिका क्षेत्रात झालेल्या वृक्षारोपणातील २३ सहस्र वृक्ष जगले. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात ९० टक्के वृक्ष सुस्थितीत असून २ वर्षे देखभालीमुळेच ही झाडे वाढली आहेत, अशी माहिती सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.

आयुक्त नितीन कापडणीस म्हणाले, ‘‘महापालिका क्षेत्रात वर्ष २०२० मध्ये २५ सहस्र वृक्षांचे रोपण करण्यात आले. महापालिका क्षेत्रात मुख्य मार्ग आणि उद्याने यांत हे वृक्ष लावण्यात आले आहेत. हे वृक्ष लावतांना ६ फुटांपेक्षा अधिक उंची आणि २ वर्षे देखभाल या अटींवरच वृक्षारोपणाचे काम संबंधितांना देण्यात आले होते. त्यामुळे ९० टक्के झाडे जगवण्यात महापालिका प्रशासनाला यश आले आहे.’’