मदरशांमध्येही शिकवले जाणार रामायण, गीता आणि योग !

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचा अभ्यासक्रम !

मदरशांमध्ये रामायण, गीता आणि योग शिकवण्यात येणार

नवी देहली – केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणार्‍या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कुलिंग’ या संस्थेच्या वतीने (एन्.आय.ओ.एस्.च्या वतीने)  देशातील १०० मदरशांमध्ये रामायण, गीता आणि योग शिकवण्यात येणार आहे. भविष्यात ५०० मदरशांमध्ये हा अभ्यासक्रम शिकवण्यात येईल, अशी माहिती एन्.आय.ओ.एस्.च्या अध्याक्षा सरोज शर्मा यांनी दिली.

हा अभ्यासक्रम नव्या शिक्षण नीतीचा एक भाग आहे. एन्.आय.ओ.एस्. या संस्थेच्या वतीने जवळपास १५ अभ्यासक्रम शिकवण्यात येतात. यात वेद, योग, विज्ञान, संस्कृत भाषा, रामायण, गीता यांसह अन्य अभ्यासक्रमांचा समावेश आहे. हे सर्व अभ्यासक्रम ३,५ आणि ८ वी इयत्तेच्या प्रारंभिक शिक्षणाच्या समान आहे.


एन्.आय.ओ.एस्.चे साहाय्यक संचालक शोएब रजा खान यांनी सांगितले की, हा अभ्यासक्रम सर्वांसाठी उपलब्ध आहे. ओपन एज्यूकेशनच्या अंतर्गत विद्यार्थी याची निवड करण्यासाठी स्वतंत्र असतील. हे अनिवार्य नाही.