हे न्यायालयाला का सांगावे लागते ? सरकारला कळत नाही का ? गेले अनेक मास विविध संघटना अशीच मागणी करत आहेत. त्यामुळे सरकारने उशिराने का होईना याविषयी नियमावली बनवली आहे; मात्र त्यामुळे असे करणार्यांना कठोर शिक्षा होईल का, हे पहावे लागेल !
नवी देहली – ‘ओवर द टॉप’ म्हणजे ओटीटी मंचावरून अश्लील साहित्य प्रसारित केले जात आहे. त्यामुळे यावरून प्रसारित होणार्या प्रत्येक साहित्याचे परिनिरीक्षण केले पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने ‘तांडव’ वेब सिरीजच्या प्रकरणात चालू असलेल्या सुनावणीच्या वेळी म्हटले.
Some OTT shows contain porn, screening needed: SC https://t.co/uzEBWn2Wpx
— TOI India (@TOIIndiaNews) March 4, 2021
तसेच न्यायालयाने केंद्र सरकारला सामाजिक माध्यमे आणि ऑनलाईन प्रसारण करणारे मंच यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बनवण्यात आलेली नवीन नियमावली सादर करण्याचा आदेश दिला आहे.
(सौजन्य : TIMES NOW)
‘अॅमेझॉन प्राईम’च्या भारतातील प्रमुख अपर्णा पुरोहित यांच्या अंतरिम जामिनावर झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने वरील आदेश दिला. यावर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.