१० ते १२ मार्च या कालावधीत श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरात संचारबंदी !

मंचर (जिल्हा पुणे) – महाशिवरात्रीनिमित्त प्रतिवर्षी श्री क्षेत्र भीमाशंकर येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते; मात्र यंदा कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा धोका विचारात घेऊन प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. जिल्हाधिकार्यांयच्या आदेशानुसार १० ते १२ मार्चपर्यंत येथे संचारबंदी असेल, अशी माहिती घोडेगाव पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिली.