३५ तुकडे करून हत्या केलेल्या श्रद्धा वालकर हिच्या वडिलांचे निधन !

वसई – प्रियकर आफताब याने ३५ तुकडे करून हत्या केलेल्या श्रद्धा वालकर हिचे वडील विकास वालकर यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे रहात्या घरी निधन झाले. वर्ष २०२२ मध्ये श्रद्धाची हत्या झाल्यापासून तिचे वडील नैराश्यात गेले होते. मुलीला मृत्यूनंतर न्याय मिळण्यासाठी ते न्यायालयीन खटला लढत होते. यामुळे त्यांची प्रचंड धावपळ होत होती. ते सतत तणावात होते.

आफताबने जंगलात फेकलेल्या श्रद्धाच्या मृतदेहांच्या तुकड्यांपैकी १३ अवशेष देहली पोलिसांना सापडले होते. तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी विकास वालकर यांनी पोलिसांकडे अन्य अवशेषांची मागणी केली; पण ते अद्याप मिळू शकलेले नव्हते.