
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेत अमनदीप सिंह नावाच्या भारतीय वंशाच्या व्यक्तीला दारू पिऊन गाडी चालवून २ मुलांना चिरडल्याच्या प्रकरणी २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दारूच्या नशेत ताशी १५० किलोमीटर वेगाने त्याने गाडी चालवली होती. ३६ वर्षीय अमनदीप सिंह एका बांधकाम आस्थापनात प्रकल्प व्यवस्थापक म्हणून काम करत होता. अमनदीप याने न्यायालयात त्याच्या कृत्याबद्दल क्षमा मागितली. मे २०२३ मध्ये न्यूयॉर्कच्या लाँग आयलंडवर हा अपघात झाला होता. या अपघातात १४ वर्षांच्या २ मुलांचा मृत्यू झाला होता.
संपादकीय भूमिकाभारतात कधी अशी शिक्षा होते का ? राजकारणी, अभिनेते, वलयांकित व्यक्ती आदींना तर कधीच शिक्षा होत नाही ! |