कृष्णा नदीच्या स्वच्छतेसाठी प्रत्येक शनिवारी विशेष मोहीम राबवणार ! – राकेश दड्डणावर

कृष्णा नदीच्या स्वच्छतेत सहभागी श्री. संजय घाटगे, श्री. राकेश दड्डणावर यांसह अन्य

सांगली – कृष्णा नदी ही सांगली शहराला लाभलेले वरदान आहे. सांगलीकरांसाठी ती जीवनदायीनी आहे; परंतु ही नदी प्रचंड प्रदूषित होत असून प्रशासनाने नदीकडे केलेले दुर्लक्ष आणि नागरिकांचे बेशिस्त वर्तन त्याला कारणीभूत आहे. त्यामुळे सांगली शहरात वर्ष २०१८ पासून कार्यरत असलेल्या राकेश दड्डणावर आणि निर्धार फाऊंडेशनने पुन्हा एकदा कृष्णा नदीचे पात्र स्वच्छ करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. गेले ४ दिवस नदीतील जलपर्णी, कर्दळी, कपडे, प्लास्टिक आणि अन्य कचरा मोठ्या प्रमाणात बाहेर काढला आहे. तरी यापुढे कृष्णामाईच्या स्वच्छतेसाठी प्रत्येक शनिवारी विशेष मोहीम राबवण्यात येईल, असे निर्धार फाऊंडेशनचे श्री. राकेश दड्डणावर यांनी सांगितले.

श्री. राकेश दड्डणावर पुढे म्हणाले, ‘‘या स्वच्छतेसाठी आम्ही नागरिकरांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे लोक या अभियानात सहभागी होत आहेत. या अभियानात हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय घाटगे यांसह स्वप्नील मस्कर, संगम केंज्योडे, मंथन सोलापुरे, भाग्यश्री दिवाळकर यांसह अन्य सांगलीकर सहभागी झाले होते.’’

संपादकीय भूमिका :

नदीच्या स्वच्छतेकडे प्रशासन दुर्लक्ष का करत आहे ?