
मुंबई – मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी राज्य शासनाने ३ कोटी रुपयांचे प्रावधान केले आहे. ग्रामीण भागासह राज्याच्या कानाकोपर्यात ही योजना पोचावी, यासाठी योजनेची विज्ञापन प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
या अंतर्गत सामाजिक माध्यमांसाठी १ कोटी ५० लाख रुपये आणि डिजिटल माध्यमाकरता १ कोटी ५० लाख रुपये अशी विभागणी करण्यात आली आहे. राज्य शासनाने यापूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी २०० कोटी रुपयांचे प्रावधान केले असून त्यातील ३ कोटी रुपये योजनेच्या माध्यम प्रसिद्धीसाठी खर्च करण्यात येणार आहेत.