नाशिक येथे ६०० कामगारांमधून ८ बांगलादेशी नागरिक कह्यात !

वेशांतर करून पोलिसांकडून बांगलादेशींचा शोध !

नाशिक – आडगाव शिवारात बांधकामाधीन प्रकल्पात कार्यरत असणार्‍या ६०० कामगारांमधून बांगलादेशी घुसखोरांना शोधायचे होते. त्यासाठी येथील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी वेशांतर केले. सलग ४ दिवस पोलीस यासाठी कामगार आणि निरीक्षक (सुपरवायझर) म्हणून कार्यरत होते. कामगारांच्या भाषेतील भेद ओळखून ८ बांगलादेशी नागरिकांना कह्यात घेण्यात आले.

संशयितांमध्ये सुमन गाझी (२७), अब्दुला मंडल (२०), शाहीन मंडल (२३), लासेल शंतर (२३), आसाद मुल्ला (३०), आलीम मंडळ (३२), अलअमीन शेख (२२), मोसीन मुल्ला (२२) यांचा समावेश आहे. संशयित सुमन गाझी हा १२ वर्षांपासून भारतात वास्तव्यास होता. (इतकी वर्षे होऊनही प्रशासन किंवा सुरक्षा यंत्रणा कुणाच्याच हे लक्षात कसे आले नाही ? – संपादक) त्याच्यासह अन्य २ जणांकडे बनावट कागदपत्रे आढळली. संशयितांकडून बांगलादेशीतील ओळखपत्रे हस्तगत करण्यात आली. गाझीच्या संपर्कातून इतर संशयित भारतात आले. तिघांनी बनावट कागदपत्रे सिद्ध केली. त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका :

  • आतापर्यंत कह्यात घेतलेल्या बांगलादेशी घुसखोरांना त्यांच्या देशात परत न पाठवल्यास हे घुसखोरीचे चक्र कदापि थांबणार नाही !
  • प्रत्येक ठिकाणी हे बांगलादेशी घुसलेले आहेत.त्यामुळेच त्यांची संख्या लाखो-कोट्यवधींच्या घरात वाढत आहे ! हे वेळीच थांबवायला हवे !