बीड जिल्ह्यातील खुंटेफळ येथील विकास कामाचा भूमीपूजन समारंभ !

बीड – जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच हत्याप्रकरणी कुणालाही सोडले जाणार नाही. राज्यात येथून पुढे अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. अन्वेषणात कुणीही आढळून आले, तरी त्याला सोडणार नाही; मात्र अन्वेषण यंत्रणा काम करत असतांना इतरांनी त्याविषयी वक्तव्य करू नये. जिल्ह्यातच नाही, तर राज्यातही अत्याचार खपवून घेतला जाणार नाही, तो कितीही मोठा असू दे, कायद्याच्या पुढे कुणी मोठा नाही, असा दम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आष्टी येथे दिला. बीड जिल्ह्यातील खुंटेफळ येथील विविध विकास कामाच्या भूमीपूजन समारंभप्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘आष्टी उपसा सिंचन योजना क्र. ३ अंतर्गत येणार्या शिंपोरा ते खुंटेफळ जलवाहिनी’च्या कामाची पहाणी केली.
या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कोनशिला अनावरण, विधीवत् पूजन करून, तसेच रिमोटद्वारे कळ दाबून बोगदा कामाचा शुभारंभ करण्यात आला.