बांधकाम सल्लागार चेतन पाटील यांना अटक

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याच्या कामात हलगर्जीपणा केल्याच्या प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील यांच्यावर सदोष वधाचा प्रयत्न, शासनाची फसवणूक आणि अन्य गंभीर कलमांच्या अतर्गत मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता..

शालेय शिक्षणाची व्यर्थता !

विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानापुरते आवश्यक तेवढे शिक्षण देऊन त्यांचा बाकीचा वेळ वरील विषय शिकवण्यापेक्षा समाजप्रेम, राष्ट्रप्रेम, धर्मप्रेम, अध्यात्मशास्त्र, साधना यांसारखे विषय शिकवण्यासाठी का वापरत नाही ? हिंदु राष्ट्रात असे सर्व विषय शिकवले जातील.’ 

अल्पसंख्यांकांसाठी पाकिस्तानच्या तुलनेत भारत अधिक सुरक्षित !

भारतात अल्पसंख्यांक असुरक्षित असल्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर जो खोटा प्रचार केला जातो, त्याला परेरा यांचे विधान, ही चपराक आहे !

मंदिरांचे सरकारीकरणही आता रहित करा !

आंध्रप्रदेश राज्यातील मंदिरांमध्ये केवळ हिंदूंनाच कामावर ठेवण्यासह मंदिरांतील पुजार्‍यांच्या वेतनात ५० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच वेदाध्ययन करणार्‍या बेरोजगार तरुणांना ३ सहस्र रुपये मासिक भत्ता दिला जाणार आहे.

बांगलादेशातील हिंदु आणि मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत !

मानवता हा धर्म मानला, तर तो बांगलादेशी हिंदूंच्या संदर्भात लागू होत नाही का ? भारतात जनगणना होऊन घुसखोर बांगलादेशींना हाकलून लावणे, हाच यावर उपाय आहे. बांगलादेशात २ कोटीहून अधिक हिंदू असूनही तेथील मंदिरे असुरक्षित असणे लज्जास्पद !

संपादकीय : चित्रपटसृष्टीतील काळेबेरे !

महिलांनी केवळ ‘स्त्री-पुरुष समानते’चा डांगोरा पिटण्यापेक्षा महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवणे आवश्यक ! अशा प्रकरणांची वाच्यता करायला हवी. मोठ्या प्रमाणात तक्रारी करायला हव्यात, संघटित होऊन आवाज उठवायला हवा.

दहीहंडी उत्सवाची विटंबना !

स्पर्धा, जीवघेणा थरार, महिलांची दहीहंडी, १२ थरांपर्यंत मनोरे, कानठळ्या बसवणारे संगीत असे बीभत्स स्वरूप टाळून उत्सव भक्तीभावाने करण्याचा प्रयत्न झाला, तर श्रीकृष्णाची कृपा अनुभवता येईल !

रामभक्ती म्हणजे काय ?

‘वि’शेषत्वाने ‘श्वास’ घ्यायचा, म्हणजे विश्वास. ‘मी प्रत्येक श्वास या रामभक्तीत जगेन, माझे प्रत्येक स्पंदन या दिव्यत्वाच्या एकतेशी असेल, याचेच नाव रामभक्ती !’ – ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण थांबण्यासाठी कठोर कायद्यांची आवश्यकता !

अशा प्रकरणांमध्ये आरोपींना आजन्म सश्रम कारावास किंवा फाशी यांच्या शिक्षेचे प्रावधान ठेवावे. लैंगिक अत्याचार करणार्‍या आरोपींवर धाक निर्माण करणे आवश्यक आहे, केवळ कायदे पालटून वा ते अधिक कठोर करून विषय थांबणार नाही.

भारताला आवाहन !

‘‘भारताची माती माझा स्वर्ग आहे, भारताच्या कल्याणातच माझे कल्याण आहे.’’ रात्रंदिवस हीच प्रार्थना कर, ‘‘हे गौरीनाथ, हे जगदंबे, मला ‘मनुष्यत्व’ दे. माते, माझी दुर्बलता, भीरुता (भित्रेपणा) दूर कर. मला ‘मनुष्य’ बनव.’’