कोल्हापूर जिल्ह्यात पूरसदृश्य स्थिती

जिल्ह्यातील काही मार्ग वाहतुकीसाठी बंद असून एस्.टी.च्या काही फेर्‍याही रहित करण्यात आल्या आहेत. राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने धरण ८३ टक्के एवढे भरले आहे.

अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या शाळांना ७०४ वर्गखोल्यांची उणीव !

जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढत आहे. त्यामुळे इतर खासगी शाळेतील विद्यार्थी मराठी शाळेकडे वळत आहेत. परिणामी जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी संख्या वाढत आहे; मात्र त्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्गखोल्या अपुर्‍या पडत आहेत.

पनवेल येथे आधारकार्डावर वाढवलेले वय अल्प करून घेण्यासाठी गर्दी !

महाराष्ट्र सरकारने आणलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा लाभ ६५ वर्षाखालील महिलांसाठी आहे. त्यामुळे याच महिला आता वाढवलेले वय अल्प करण्यासाठी आधार अद्ययावत् करून देणार्‍या सेतू केंद्रावर गर्दी करत आहेत

पुणे येथे मराठी बोलण्यास नकार दिल्याने औषध दुकानदारास मारहाण

तू महाराष्ट्रात रहातोस, तुला मराठी बोलता यायलाच पाहिजे, असे म्हणत मराठी बोलण्यास नकार देणार्‍या यश छल्लानी याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली.

डोंबिवली येथील महाविद्यालयीन अल्पवयीन विद्यार्थिनीला ॲसिड आक्रमणाची धमकी !

अशी धमकी देणार्‍याला पोलिसांनी तात्काळ अटक करून  कठोर शिक्षाच करायला हवी !

बेळगाव येथे हिंदु गतीमंद मुलीवर अनोळखी अन्य धर्मीय व्यक्तीकडून बलात्काराचा प्रयत्न

मुलीने आरडाओरड करताच मुलीचे काका तात्काळ घरात गेले. त्यांनी आरोपीला पकडून मारहाण केली. त्या वेळी त्याने बेशुद्ध पडल्याचे ढोंग केले आणि नंतर तेथून पलायन केले.

भाग्‍यनगर येथून विशाळगडावर येऊन तेथील मुसलमानांना पैसे वाटणार्‍यांची सखोल चौकशी करा ! – रमेश शिंदे, राष्‍ट्रीय प्रवक्‍ते, हिंदु जनजागृती समिती

विशाळगड येथील अनधिकृत बांधकामाच्‍या संदर्भात हिंदुत्‍वनिष्‍ठांनी आंदोलन केल्‍यावर अनेक ‘सेक्‍युलरवादी’ नेत्‍यांनी तेथील अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष करून ते करणार्‍या मुसलमानांचा सहानुभूती व्‍यक्‍त केली आहे.

‘Swastik’ And ‘Hackenkreuz’ Different : हिंदूंचे ‘स्वस्तिक’ आणि नाझींचे ‘हॅकेनक्रूझ’ यांच्यात भेद !

स्वस्तिक हे सहस्रो वर्षांपासून आहे, तर त्याच्याशी साधर्म्य असलेले ‘हॅकेनक्रूझ’ हे अलीकडचे आहे. स्वस्तिकला हिंदु धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे, हेही भारतियांनी विदेशी नागरिकांना समजावून सांगितले पाहिजे !

Muslim Rashtriya Manch : दुकानांवर मालकांची नावे लिहिण्याच्या आदेशाचे ‘मुुस्लिम राष्ट्रीय मंच’कडून समर्थन

बैठकीनंतर प्रसारित करण्यात आलेल्या निवेदनात मंचाने कावड यात्रेकरूंचे मनापासून स्वागत करून समाजात एकता निर्माण करणार असल्याचे स्पष्ट केले.

Bangladesh Supreme Court : बांगलादेशाच्‍या सर्वोच्‍च न्‍यायालयाने आरक्षणाची मर्यादा ५६ टक्‍क्‍यांवरून ७ टक्‍क्‍यांवर आणली !

‘९३ टक्‍के नोकर्‍या गुणवत्तेच्‍या आधारावर दिल्‍या जातील’, असे न्‍यायालयाने आदेशात स्‍पष्‍ट केले आहे.