मोकाट जनावरे पकडण्याची मोहिमेला जोर !
सांगली, ५ ऑक्टोबर (वार्ता.) – सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या वाहनाचा २ ऑक्टोबरच्या सायंकाळी येथील स्फूर्ती चौकातून पूर्वेकडे जाणार्या रस्त्यावर अपघात झाला. आयुक्तांच्या वाहनासमोर कुत्रे आडवे आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वाहन विजेच्या खांबावर आदळले. यामध्ये आयुक्त शुभम गुप्ता हे घायाळ झाले असून त्यांच्यावर मिरज येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. आता त्यांची प्रकृती ठीक आहे. या अपघातात आयुक्तांचे ३ नातेवाईकही किरकोळ घायाळ झाले आहेत. (गेल्या अनेक वर्षांपासून महापालिका क्षेत्रातील मोकाट जनावरांचा नागरिक आणि वाहनचालक यांना प्रचंड त्रास होत असतांना त्याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले. आता आयुक्तांनाच या समस्येचा सामना करावा लागला. त्यामुळे ही समस्या न सोडवणार्या संबंधित अधिकार्यांवर कठोर कारवाई करायला हवी ! – संपादक)
आयुक्तांच्याच वाहनाचा अपघात झाल्याने मोकाट कुत्री आणि जनावरे पकडण्याच्या मोहिमेला जोर आला आहे.