कोल्हापूर – उत्तराखंडमध्ये हल्दवानी या ठिकाणी अनधिकृत बांधकामे तोडली गेल्यावर ‘हैदराबाद युथ करेज’ नावाचा फेसबुकवर कार्यरत असलेल्या गटातील काही लोक मुसलमानांना नोटांची बंडल वाटतांना दिसले होते. हाच गट विशाळगडावर मुसलमानांना नोटांची बंडले वाटतांना दिसत आहे. या वाटपाचा व्हिडिओ त्यांनी सामाजिक माध्यमांवर प्रसारित केला आहे.
हे सर्व होत असतांना पोलीस प्रशासन नेमके काय करत आहे ? हा पैसा या गटाला कुठून उपलब्ध झाला ? या पैशांच्या माध्यमातून ते मुसलमानांना नेमके काय सांगतात ? काय संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत ? तरी विशाळगडावर भाग्यनगर येथून येऊन तेथील मुसलमानांना पैसे वाटणार्यांची चौकशी करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी कोल्हापूर पोलीस अधीक्षक, पोलीस महासंचालक आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
Conduct a thorough inquiry into individuals arriving from Bhagyanagar, Telangana to Vishalgad fort and distributing money to Mu$l!ms
– @Ramesh_hjs National Spokesperson, @HinduJagrutiOrg pic.twitter.com/TWJFvQDGTr— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 22, 2024
या संदर्भात श्री. रमेश शिंदे म्हणाले,
१. कोल्हापूर येथे विशाळगड येथील अनधिकृत बांधकामाच्या संदर्भात हिंदुत्वनिष्ठांनी आंदोलन केल्यावर अनेक ‘सेक्युलरवादी’ नेत्यांनी तेथील अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष करून ते करणार्या मुसलमानांचा सहानुभूती व्यक्त केली आहे.
२. एकीकडे सरकारकडून साहाय्य मागण्याचा प्रयत्न चालू असतांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे मुसलमानांना साहाय्य करण्याच्या नावाखाली त्यांना कुठेतरी भ्रमित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
३. ‘त्या माध्यमातून काही वेगळा प्रचार चालू आहे का ?’ हे आज संशयाचे सूत्र निर्माण झाले आहे. भाग्यनगर येथून येऊन मुसलमानांना घरोघरी जाऊन पैसे वाटणारा गट नेमका कुठला आहे ? हे पैसे वाटून त्यांना काय साध्य करायचे आहे ? याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे.
४. ही चौकशी होण्यासाठी त्यांना तात्काळ कारवाई करून कह्यात घेतले पाहिजे. हिंदु समाजाची ही मागणी असून असे न केल्यास वातावरण आणखी भडकण्याची स्थिती निर्माण होईल.