पनवेल – यापूर्वी राज्य परिवहन मंडळाचा प्रवास महाराष्ट्र्र राज्यात ६५ वर्षे वयानंतरच्या महिलांसाठी विनामूल्य होता. त्यामुळे अनेक महिलांनी आधारकार्डवर वय वाढवून घेतले होते. आता महाराष्ट्र सरकारने आणलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा लाभ ६५ वर्षाखालील महिलांसाठी आहे. त्यामुळे याच महिला आता वाढवलेले वय अल्प करण्यासाठी आधार अद्ययावत् करून देणार्या सेतू केंद्रावर गर्दी करत आहेत, असे कळंबोली, पनवेल या परिसरात लक्षात आले आहे. याविषयीचे वृत्त नुकतेच दैनिक ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते.
हे आधारकार्ड अद्ययावत् करून घेण्यासाठी वयाचा पुरावा म्हणून महिलांना ग्रामपंचायत कार्यालयाचा रहिवासी दाखला आवश्यक आहे, तसेच भ्रमणभाष क्रमांक आवश्यक आहे. हे आधारकार्ड नवीन वयासहित २१ दिवसांत अद्ययावत् करून दिले जाते, असे समजते.