France Women Right To Abortion : फ्रान्समध्ये महिलांनी गर्भपात करण्याला राज्यघटनेची स्वीकृती !

स्वैराचाराला प्रोत्साहन देणार्‍या या घटनात्मक अधिकारामुळे उद्या फ्रान्सची अधोगती व्हायला लागल्यास आश्‍चर्य वाटू नये !

(म्हणे) ‘माझा रामायणावर आणि प्रभु रामावर विश्‍वास नाही !’ – ए. राजा, खासदार, द्रमुक

रावणाचाही श्रीरामावर विश्‍वास नव्हता, तेथे ए. राजा यांचा विश्‍वास नसेल, तर हिंदूंना काही समस्या नाही ! नाहीतरी द्रमुक नास्तिकतावादीच आहे !

हिजबुल्लाच्या इस्रायलवरील आक्रमणात एका भारतियाचा मृत्यू, तर २ जण घायाळ  

लेबनॉनमधील हिजबुल्ला या आतंकवादी संघटनेने इस्रायलवर केलेल्या क्षेपणास्त्राच्या आक्रमणात पटनिबिन मॅक्सवेल या भारतीय तरुणाचा मृत्यू झाला, तर बुश जोसेफ जॉर्ज आणि पॉल मेलविन हे दोघे भारतीय घायाळ झाले.

अटकेत असलेला शहरी नक्षलवादी प्रा. साईबाबा याची मुक्तता !

नक्षली आणि देशविरोधी कारवाया यांप्रकरणी अटकेत असलेला शहरी नक्षलवादी, तसेच देहली विद्यापिठातील प्राध्यापक जी.एन्. साईबाबा याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने निर्दोष मुक्त केले.

रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केले डॉ. एस्. जयशंकर यांचे कौतुक !

‘युक्रेन युद्धाच्या वेळी भारत रशियाकडून तेल का खरेदी करत आहे ?’, असा प्रश्‍न रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लॅव्हरोव्ह यांना एका कार्यक्रमात विचारण्यात आला. यावर लॅव्हरोव्ह यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांचे कौतुक करत म्हटले की, माझे मित्र जयशंकर यांनी याचे चांगले उत्तर दिले होते.

काँग्रेसच्या एकाही सदस्याला काळ्या पाण्याची शिक्षा का झाली नाही ? – ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटातील संवाद

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील वीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा हिंदी आणि मराठी भाषेत चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यातील हिंदी भाषेतील चित्रपटाचा ट्रेलर (विज्ञापन) प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.

रेल्वेतून उतरतांना प्रवाशांनी चादर आणि ब्लँकेट रेल्वे कर्मचार्‍यांकडे देणे बंधनकारक !

भारतात प्रतिदिन रेल्वेने प्रवास करणार्‍यांची सरासरी संख्या अनुमाने १.८५ कोटी आहे. त्यांपैकी ८.५७ लाख लोक वातानुकूलित डब्यांतून प्रवास करतात. त्यांच्यासाठी रेल्वेकडून चादर आणि ब्लँकेट आणि काही वेळा टॉवेल दिले जातात.

सौदी अरेबियापेक्षा भारतात मुसलमान अधिक सुरक्षित ! – अब्दुल सलाम, माजी कुलगुरु, केरळ

याविषयी भारतातील मुसलमानप्रेमी निधर्मीवाद्यांना काय म्हणायचे आहे ?

जिल्हाधिकार्‍यांना भगवान श्रीकृष्णाचे संरक्षक घोषित करण्यासाठी न्यायालयात याचिका !

श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टकडून ५ मार्च या दिवशी मथुरा जिल्हा न्यायालयात एक याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यात आली. श्रीकृष्णजन्मभूमीच्या १३.३७ एकर भूमीचे हे प्रकरण असून ‘भगवान श्रीकृष्णाची श्रीकृष्णजन्मभूमीत बालकाच्या रूपात पूजा केली जाते.

Maldives China Agreement : मालदीव-चीन यांच्यात झाला करार : चीन विनामूल्य सैनिकी साहाय्य पुरवणार !

मालदीवचे संरक्षणमंत्री महंमद मौमून यांनी चीनच्या आंतरराष्ट्रीय सैनिकी सहकार्य विभागाचे अधिकारी मेजर जनरल झांग बाओकुन यांची भेट घेतली.