लक्ष्य फाऊंडेशनच्या ‘मेरा देश, मेरी पहचान’ या संकल्पनेतून आणि गाज फाऊंडेशनच्या सहयोगाने ‘कारगिल विजय रजत महोत्सवा’चे आयोजन !

लक्ष्य फाऊंडेशनच्या संस्थापिका सौ. अनुराधा प्रभुदेसाई या दोनही योद्ध्यांसमवेत कारगिल युद्धाच्या चित्तथरारक अनुभवाविषयी दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाद्वारे युवकांमध्ये देशप्रेमाची ज्योत पेटवण्याचा आणि ‘राष्ट्र प्रथम’ या विचाराचा जागर करण्याचा, तसेच सुजाण आणि विवेकी युवक निर्माण करण्याचा लक्ष्य फाऊंडेशनचा प्रयत्न आहे.

सांगली येथील अनधिकृत पशूवधगृह महापालिकेने तात्काळ बंद करावे !

गोवंश हत्याबंदीचा कायदा असूनही गोवंशियांच्या रक्षणासांठी हिंदुत्वनिष्ठांना अजून किती वर्षे लढावे लागणार ?

सीमावर्ती भागात अशांतता निर्माण करणार्‍या शक्ती कमकुवत होत आहेत ! – मनमोहन वैद्य, सहसरकार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

संघ स्वयंसेवकांना प्रतिकूल परिस्थितीत काम करण्याची आधीपासून सवय असून हळूहळू सीमावर्ती भागातही अशांतता निर्माण करणार्‍या शक्ती कमकुवत होत आहेत. दुसरीकडे देशभरात संघ संघटन वाढत आहे.

पुणे येथे ‘स्पा सेंटर’च्या दारात पोलीस उपनिरीक्षकाचा मृतदेह !

एका इमारतीतील ‘विवा स्पा सेंटर’मध्ये गेले; परंतु सेंटर बंद होते. कुरळे त्याच जिन्याने वरच्या मजल्यावर गेले; मात्र मजला चढत असतांना त्यांचा तोल गेला.

पुणे येथे विनोद खुटे यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाकडून कारवाई !

भारतामध्ये गुन्हे करून परदेशांमध्ये पळून जाणार्‍यांना अटक करून त्यांना कडक शिक्षा केली पाहिजे !

परिवहन विभागाच्या कठोर कारवाईच्या धास्तीने ‘ॲप’द्वारे सेवा देणार्या ‘टॅक्सी’ गायब !

परिवहन विभागाने नेहमीच अशी भूमिका घेणे आवश्यक आहे !

पुणे येथे अमली पदार्थांची विक्री करणार्या ललित पाटील याच्यासह १४ जणांवर दोषारोपपत्र प्रविष्ट !

मकोका न्यायालयाचे विशेष न्यायाधीश व्ही.आर्. कोचरे यांच्या न्यायालयामध्ये हे दोषारोपपत्र प्रविष्ट केले. अमली पदार्थ विक्री संदर्भातील प्रकरणांमध्ये ‘मकोका’ अंतर्गत प्रविष्ट केलेले हे पहिलेच दोषारोपपत्र आहे.

श्री महालक्ष्मीदेवी मंदिरातील मनकर्णिका कुंड आणि अन्य कामे यांसाठी २१ कोटी ६८ लाख रुपये व्ययासाठी राज्यशासनाची मान्यता !

यात मनकर्णिका कुंड कामासाठी ५ कोटी ४० लाख ९९ सहस्र ९३४ रुपये, गरुड मंडप दुरुस्तीसाठी १२ कोटी ८५ लाख ९२ सहस्र ८७ रुपये, तर नगारखाना इमारत दुरुस्तीसाठी ३ कोटी ४१ लाख ३४ सहस्र ७७३ रुपये व्यय केले जाणार आहेत.

पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ३ आगीच्या घटना !

सुसगाव येथील ‘बेलाकासा’ इमारत येथे असलेल्या कामगारांच्या वसाहतीमध्ये ३ गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन झोपड्यांना आग लागली. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसून संसारापयोगी साहित्य जळून खाक झाले.

सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपमध्ये प्रवेश !

‘ज्या सरकारचे सनातन धर्माशी नाते आहे, त्या सरकारशी मी जोडले गेले, याचा मला पुष्कळ आनंद झाला आहे’, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.