मान्सूनपूर्व नाले स्वच्छता मोहिमेच्या अंतर्गत १३ नाल्यांची स्वच्छता !

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने मान्सूनपूर्व नाले स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत १३ मुख्य आणि ४७६ छोटे नाले यांची स्वच्छता करण्यात आली आहे. याद्वारे ५० डंपर गाळ काढण्यात आला आहे.

आयात होणारी ‘बॉडी मसाज’ करणारी उपकरणे जप्त करू शकत नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

बॉडी मसाजसाठीच्या उपकरणांचा देशांतर्गत बाजारपेठांत व्यापार केला जातो आणि त्या प्रतिबंधित वस्तू मानल्या जात नाहीत. त्यामुळे बॉडी मसाजसाठीची उपकरणे ही निषिद्ध वस्तू असल्याची सीमाशुल्क आयुक्तांची कल्पना असल्याची टिपणी न्यायालयाने केली.

सार्वजनिक शौचालयाच्या गटारात पडून २ जणांचा मृत्यू, १ गंभीर घायाळ !

मालाड मालवणी येथे एका सार्वजनिक शौचालयाच्या गटारात ३ तरुण पडल्याची घटना २१ मार्च या दिवशी संध्याकाळी घडली. मालवणी गेट क्रमांक ८ येथे घडलेल्या या घटनेतील दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

आचारसंहितेसाठी रासायनिक खतांच्या गोणीवरील पंतप्रधानांची छबी मिटवण्याचे कृषि विभागाचे आदेश

रासायनिक खतांच्या गोण्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छापण्यात आलेल्या प्रतिमांमुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याने कृषी विभागाने पंतप्रधान मोदी यांच्या गोण्यांवरील त्या छबीवर ब्रशद्वारे लाल रंग देऊन ती प्रतिमा खोडावी आणि नंतरच गोणी वितरीत करावी, अशा सूचना केली आहे.

मुलाने बलात्कार केल्याचे सांगून वडिलांकडून तोतया पोलिसाने पैसे उकळले !

शीव कोळीवाडा येथील केंद्रीय शाळेतील एका शिक्षकाकडून मुलाला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्याची धमकी देत सुमारे दीड लाख रुपये उकळण्यात आले. या प्रकरणी कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

प्रेयसीची हत्या केलेल्या प्रियकराला अटक

लग्न करून संपत्ती नावावर करण्यासाठी बळजोरी करणार्‍या प्रेयसीची प्रियकराने हत्या केली. प्रियकराला आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे. 

पुणे परिमंडळातील ५ लाख वीजग्राहकांकडे १२४ कोटी रुपयांची थकबाकी

एवढ्या मोठ्या प्रमाणात थकबाकी कशी काय रहाते ? याला उत्तरदायी असणार्‍यांनाही कठोर शिक्षा होणे आवश्यक ! शासकीय सुटीच्या दिवशी वीजदेयक भरणा केंद्रे चालू करणे, म्हणजे ‘उशिरा सुचलेले शहाणपण’ असेच म्हणावे लागेल !

भारती विद्यापिठातील विद्यार्थिनीच्या आत्महत्येच्या घटनेची विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांच्याकडून गंभीर नोंद !

येथील भारती विद्यापिठातील वसतीगृहातील एका विद्यार्थिनीने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या प्रकरणाची उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी गंभीरपणे नोंद घेतली.

नवी मुंबईत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंच, नवी मुंबई यांच्या वतीने आमदार गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये २२ मार्च या दिवशी बहुचर्चित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचे ‘स्पेशल स्क्रीनिंग’ करण्यात आले. चित्रपटाला सावरकरप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

केजरीवालांची अटक पूर्णपणे चुकीची ! – शरद पवार

राज्याच्या प्रमुखाला अटक करणे आणि त्याने धोरणे ठरवली म्हणून त्यासाठी अटक करणे हे पूर्णपणे गैरवाजवी आहे, चुकीचे आहे. त्यांच्यावर झालेल्या कारवाईचा १०० टक्के परिणाम राज्यातील जनतेवर होणार आहे, असे वक्तव्य बारामती दौर्‍यात शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन केले.