सौदी अरेबियापेक्षा भारतात मुसलमान अधिक सुरक्षित ! – अब्दुल सलाम, माजी कुलगुरु, केरळ

भाजपचे उमेदवार अब्दुल सलाम

मलप्पुरम (केरळ) – सौदी अरेबियापेक्षा भारतात मुसलमान अधिक सुरक्षित आहेत. मदरशांमधून मिळणार्‍या चुकीच्या मार्गदर्शनामुळे मुसलमान अंधारात चाचपडत आहेत. त्यांना पंतप्रधान मोदी यांच्या प्रकाशाची आवश्यकता आहे, असे वक्तव्य केरळच्या मल्लप्पुरम् लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अब्दुल सलाम यांनी ‘न्यूज १८’शी संवाद साधतांना केले. अब्दुल सलाम कोळीकोड विद्यापिठाचे माजी कुलगुरु आहेत. अब्दुल सलाम हे देशातील सर्वांत शिक्षित नेत्यांपैकी एक आहेत. ते केरळ कृषी विद्यापिठात प्राध्यापकही होते. अब्दुल सलाम यांनी आतापर्यंत १५३ शोधनिबंध लिहिले आहेत. त्यांनी लिहिलेली १५ पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.

अब्दुल सलाम पुढे म्हणाले,

१. पंतप्रधान मोदी यांनी देशातील अल्पसंख्याकांसाठी जेवढे काम केले, तेवढे कुणी केले नाही. पंतप्रधान मोदी यांच्याविषयी मुसलमानांच्या मनात भरलेली नकारात्मकता दूर करणे आवश्यक आहे.

२. केरळमधील मुसलमान एका वेगळ्या युगात जगत आहेत. ते भ्रमात आहेत. वास्तव असे आहे की, पंतप्रधान मोदी यांनी देशातील मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्या विकासासाठी बराच वेळ आणि पैसा दिला आहे.

३. इतर कुठल्याही देशापेक्षा भारतात अल्पसंख्य सुरक्षित आहेत. जगातील कोणत्याही देशापेक्षा भारतातील मुसलमानांना अधिक स्वातंत्र्य आहे. विरोधी पक्ष केवळ अपप्रचार करत आहे.

संपादकीय भूमिका

याविषयी भारतातील मुसलमानप्रेमी निधर्मीवाद्यांना काय म्हणायचे आहे ?