विरोधकांचा प्रस्ताव म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा !’ – आशिष शेलार, आमदार, भाजप

शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन साहाय्य करणार, सातबारा कोरा करणार, सरसकट कर्जमाफी करणार, अशा घोषणा तत्कालीन आघाडी सरकारने त्यांच्या काळात केल्या, त्याचे काय झाले ? याचे उत्तर आधी द्यावे. मगच आम्हाला प्रश्न विचारावेत, अशी टीका त्यांनी केली विधानसभेत केली.

वारंवार होणार्‍या पेपरफुटीच्या प्रकरणी विशेष अन्वेषण पथक स्थापन करण्याची मागणी !

राज्यात वारंवार होणार्‍या पेपरफुटीच्या प्रकरणी विधीमंडळाच्या पायर्‍यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी आंदोलन केले. यामध्ये १० ते १२ आमदार सहभागी झाले होते.

कर्नाटकच्या विधानसभेत हिंदु मंदिरांच्या उत्पन्नावर १० टक्के कर घेणारे विधेयक पुन्हा संमत  

कर्नाटकातील काँग्रेस सरकार राज्यातील मशिदी आणि चर्च यांसाठी असा कायदा करत नाही, हे लक्षात घ्या !

ब्राह्मणांना धमकी दिलेल्या सर्वांची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश !

 गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून ‘महाराष्ट्रातील ब्राह्मणांना २० मिनिटांत कापून काढू’ अशी भाषा करणारी व्यक्ती बारामतीशी संबंधित आहे.

वर्ष २०२२-२३ मध्ये ६ प्रमुख राजकीय पक्षांचे एकूण उत्पन्न ३ सहस्र ७७ कोटी रुपये !

‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ने २८ फेब्रुवारी या दिवशी देशातील ६ राष्ट्रीय पक्षांचे २०२२-२३ या आर्थिक वर्षातील एकूण उत्पन्न एका अहवालाद्वारे घोषित केले.

शाळांमध्ये मराठीचे अध्ययन सक्तीचे करण्याविषयीच्या अधिनियमाची काटेकोर कार्यवाही करा !

मराठीची सध्याची दुःस्थिती पहाता केवळ आदेश देऊन चालणार नाही, तर ही कार्यवाही होत आहे का, याचाही पाठपुरावा घ्यायला हवा !

Goa International DrugRacket Busted गोव्यातून कार्यरत असलेले अमली पदार्थ व्यवसायाचे आंतरराष्ट्रीय जाळे उद्ध्वस्त !

भारतात अवैधपणे विदेशी नागरिकांना वास्तव्य करू देणार्‍या आणि कसून चौकशी न करता त्यांना सोडणार्‍या संबंधित पोलिसांवरही कारवाई होणे आवश्यक !

सौ. सुरेखा (माई) सुरेश पुराणिक यांचा दशक्रिया विधी !

‘जय शंकर प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष श्री. सुरेश उपाख्य पप्पाजी पुराणिक यांच्या पत्नी सौ. सुरेखा (माई) सुरेश पुराणिक यांना २१ फेब्रुवारी या दिवशी देवाज्ञा झाली. सौ. पुराणिक यांचा दशक्रिया विधी १ मार्च या दिवशी हडपसर येथे होणार आहे.

अंतरिम अर्थसंकल्प राज्याला दिवाळखोरीकडे नेणारा ! – विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते

वडेट्टीवार म्हणाले की, अर्थसंकल्पात महिलांना साड्या वाटप करण्यासाठी निधीचे प्रावधान केले. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सरकारी पैशातून मते मिळवण्यासाठी केलेला हा उद्योग आहे……

मुंबईतील जागांवरील पुनर्विकासाचे प्रश्न देहलीला जाऊन निकाली काढावेत ! – प्रवीण दरेकर, गटनेते, विधान परिषद

मुंबईत असलेल्या केंद्र सरकारच्या जागांवर जे पुनर्विकासाचे प्रश्न आहेत, त्यासंदर्भात शिष्टमंडळ घेऊन दिल्ली दरबारी जाऊन हे प्रश्न सरकारने निकाली लावावेत, अशी मागणी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेच्या सभागृहात बोलतांना व्यक्त केली.