‘वंदे भारत’मध्ये १ लिटरऐवजी अर्धा लिटरची पाण्याची बाटली मिळणार !

प्रवाशांनी अतिरिक्त पाण्याच्या बाटलीची मागणी केल्यास त्याला अधिकची ५०० मिलीची पाण्याची बाटली कोणतीही अतिरिक्त रक्कम न आकारता देण्यात यावी. दुसरी रेलनीरची बाटली विनामूल्य द्यावी, अशी सूचना रेल्वे मंडळाने ‘आय.आर्.सी.टी.सी.’ला दिली आहे.

पुणे जिल्‍ह्यातील ७१ मंदिरांमध्‍ये वस्‍त्रसंहिता लागू !

पुणे जिल्‍ह्यातील ज्‍योतिर्लिंग श्रीक्षेत्र भीमाशंकर, तसेच पुण्‍याचे ग्रामदैवत  कसबा गणपति मंदिर यांसह ७१ मंदिरांमध्‍ये वस्‍त्रसंहिता लागू करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे १० सहस्र रुपयांची लाच घेतांना धर्मादाय आयुक्त कार्यालयातील निरीक्षकास अटक !

भ्रष्टाचाराने पोखरलेले धर्मादाय आयुक्त कार्यालय !

प्रीतमताईंना विस्थापित करणार नाही ! – सौ. पंकजा मुंडे-पालवे, भाजप नेत्या

सौ. पंकजा मुंडे-पालवे पुढे म्हणाल्या की, गेल्या १० वर्षांपासून प्रीतम मुंडे या ठिकाणी चांगले काम करत आल्या आहेत; पण आमच्या दोघींपैकी कुणाला तरी तिकीट मिळेल, अशी अपेक्षा नक्की होती. त्यात माझे नाव घोषित झाल्याने कोणताही धक्का बसलेला नाही.

साम्‍यवादी विचारांचा पगडा असलेल्‍या ‘जे.एन्.यू.’मध्‍ये अभ्‍यासता येणार छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र !

साम्‍यवादी विचारांचा पगडा असलेल्‍या जवाहरलाल नेहरू विद्यापिठात (‘जे.एन्.यू.’त) छत्रपती शिवाजी महाराज यांचा त्‍यांच्‍या चरित्रासह सर्वांगाने अभ्‍यास करण्‍यासाठी अध्‍यासन केंद्र उभारले जाणार आहे.

‘हुबळी-दादर एक्सप्रेस’ला किर्लोस्करवाडी येथे थांबा संमत ! – संजयकाका पाटील, खासदार, भाजप

सातत्याने किर्लोस्करवाडी येथे नवीन रेल्वे थांबा संमत करण्यासाठी मागणी होत होती. थांबा संमत झाल्यामुळे प्रवाशांना लाभ होणार आहे, अशी माहिती संजयकाका पाटील यांनी दिली.

आज घोषित होणार लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक !

१६ मार्चला दुपारी ३ वाजता नवी देहली येथे निवडणूक आयोगाच्या कार्यालयात देशातील लोकसभेच्या निवडणुकीविषयी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

निवडणुकीत महिलांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, तर शिवसेनेच्या पद्धतीने उत्तर देण्यात येईल !

डॉ. गोर्‍हे पुढे म्हणाल्या की, महिलांची संख्या राजकारणात, तसेच समाजकारणात वाढत आहे. महिलांची मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी शिवसेना महिला आघाडीने पुढाकार घेऊन काम करण्याची आवश्यकता आहे

कोट्यवधी रुपयांच्या मॅफेड्रोनची तस्करी करणार्‍या धर्मांधाला अटक !

नवीन पिढीला व्यसनाधीन करून राष्ट्रहानी करणार्‍यांवर कठोर कारवाई करा !

इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांचा पुणे, मुंबई यांसह गुजरातमधील प्रमुख शहरांत बाँबस्फोटांचा कट !

भारतात जिहादी आतंकवाद्यांची पाळेमुळे किती खोल पसरली आहेत, हे यातून दिसून येते. हा आतंकवाद रोखण्यासाठी सरकारने पावले उचलणे आवश्यक !