नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांत भूकंपाचे सौम्य धक्के !

नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांतील काही भागांत २१ मार्चला सकाळी ६.०५ ते ६.२४ या कालावधीत भूकंपाचे ३ सौम्य धक्के जाणवले. हा भूकंप ४.५ रिक्टर स्केलचा असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सांगितले.

शिक्षकांच्या वस्त्रसंहितेला पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचा विरोध !

विद्यार्थी अनुकरणप्रिय असतात. त्यामुळे जर शिक्षकाची वेशभूषा ही अशोभनीय असेल, तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वावर होतो. ही गोष्ट लक्षात घेऊन शिक्षण विभागाने राज्यातील सर्व  शिक्षकांसाठी नवीन वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे

कर्नाळा गडाची स्वच्छता करून राष्ट्र आणि धर्म कार्यासाठी घेतले श्री कर्नाईमाता देवीचे आशीर्वाद !

रायगड जिल्ह्यातील पनवेलपासून जवळच असलेल्या कर्नाळा गडावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘एक दिवस गड-दुर्गांच्या सान्निध्यात’ मोहीम घेण्यात आली. गडदेवता श्री कर्नाईमाता देवीच्या मंदिराची स्वच्छता करून तेथे नामजप करण्यात आला.

१ एप्रिलपासून ९६ रेल्वे स्थानकांवर ‘क्यू.आर्. कोड’च्या माध्यमातून रेल्वे तिकीट काढता येणार !

तिकीट काढण्यासाठी पूर्वी प्रवाशांना मोठ्या रांगेत उभे रहावे लागत असे; मात्र केंद्रशासनाने आता रेल्वे स्थानकांवरून रेल्वेचे सामान्य तिकीट ऑनलाईन पद्धतीने काढता येणार आहे. ही सुविधा देशभरातील सर्व रेल्वे स्थानकांवर उपलब्ध होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भगवे ध्वज काढण्याची अनाठायी कृती थांबवा ! – हिंदु जनजागृती समिती

‘लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भगवे ध्वज काढण्याची अनाठायी कृती थांबवा’, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगली जिल्हा प्रशासनास देण्यात आले.

अटल सेतूवरून उडी मारून महिलेची आत्महत्या !

दादर येथे कुटुंबियांसमवेत रहाणार्‍या डॉ. किंजल शाह (वय ४३ वर्षे) यांनी अटल सेतूवर येताच टॅक्सी चालकाला ‘छायाचित्र काढायचे आहे’, असे सांगून टॅक्सी थांबवून थेट समुद्रात उडी मारली.

नाशिक येथे दहा आखाड्यांकडून महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज हे लोकसभेसाठी उमेदवार !

त्र्यंबकेश्वरमधील दहा आखाड्यांनी एकत्र येत लोकसभा निवडणुकीत महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज हे नाशिक लोकसभेसाठी उमेदवार म्हणून दिले आहेत.

नाशिकमध्ये रस्त्यावर मॅफेड्रॉन विकणार्‍याला अटक !

अमली पदार्थांची बजबजपुरी होईपर्यंत पोलीस काय करत होते ? प्रत्येक शहरात कित्येक वर्षे गल्लोगल्ली दिसणार्‍या गर्दुल्ल्यांकडे पोलिसांनी वेळीच लक्ष दिले असते, तर आजसारखी भयानक अवस्था झाली नसती !

‘बर्ड फ्ल्यू’च्या भीतीने लोकांनी चिकन खाणे सोडले !

शहरात रविवारी ३० टन चिकनची मागणी असते; मात्र काही दिवसांपूर्वी शहरातील काही कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू झाल्याने ही मागणी घटली आहे. शहरात अंडी आणि चिकन यांची मागणी जवळपास निम्म्यावर आली आहे.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट करमुक्त करा ! – अजय सिंह सेंगर, प्रमुख, महाराष्ट्र करणी सेना

अजय सिंह सेंगर यांनी निवेदनात म्हटले आहे की, प्रत्येक नागरिकामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याप्रमाणे देशप्रेम जागृत होणे आवश्यक आहे. गांधीवादाला आदर्श समजणारे राजकीय पक्ष आणि जनता यांना गांधी यांचे खरे स्वरूप समजणे आवश्यक आहे