बिकानेरमध्ये (राजस्थान) हिंदु जनजागृती समितीच्या ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियाना’ला उत्स्फूर्त प्रतिसाद !

हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी राजस्थानच्या बिकानेरमध्ये भाजप आमदार श्री. जेठानंद व्यास, ‘भाजयुमो’चे बिकानेर जिल्हाध्यक्ष वेद व्यास आणि ‘महाराजा गंगा सिंह विद्यापिठा’चे कुलगुरु यांची भेट घेतली.

पाण्याचा अपव्यय केल्यास नळजोडणी खंडित करणार ! – पिंपरी महापालिकेची चेतावणी

उन्हाळा चालू झाला असल्याने सध्या पाण्याची मागणी वाढली आहे. जूनमध्ये पाऊस पडण्याची शाश्वती नसल्याने नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. वाहन, रस्ते, घर, गृहनिर्माण संस्था परिसर धुण्यासाठी पाण्याचा अनावश्यक वापर केल्यास प्राथमिक टप्प्यात नोटीस देऊन अवगत करण्यात येईल.

रस्ते खोदणे आणि बुजवणे ही कामे वेळेत अन् योग्य पद्धतीने करण्याचा पुणे पालिकेचा आदेश !

खोदण्याची कामे अनुमतीनुसार, तसेच दिलेल्या वेळापत्रकानुसार झाली नाहीत, तसेच खोदल्यानंतर रस्ते व्यवस्थित दुरुस्त केल्याचे पहाणीमध्ये आढळले नाही, तर संबंधित पथ विभागातील कनिष्ठ अभियंता आणि उपअभियंत्यावर कारवाई केली जाणार आहे.

मुंबई महापालिकेच्या झोपडपट्ट्यांतील कचरामुक्ती प्रकल्पाच्या निविदेला प्रतिसाद नाही !

मुंबईत यापूर्वी ‘स्वच्छता मुंबई प्रबोधन अभियान’ नावाची योजनाही पूर्णपणे अपयशी ठरली. घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे, स्वच्छतागृहांची स्वच्छता आणि देखभाल अन् मलनि:सारण वाहिन्यांची नीट देखभाल करणे अशा ३ गोष्टी त्यांत होत्या.

मणेरवाडी (पुणे) येथे १५ वर्षीय मुलाची हत्या !

मैत्रीतून झालेल्या चुकीच्या समजुतीतून २ अल्पवयीन मुलांनी प्रकाश राजपूत या १५ वर्षीय शाळकरी मुलाची कोयत्याने वार करून हत्या केली. ही घटना मणेरवाडी (खानापूर, सिंहगड पायथा) परिसरातील आनंदवन सोसायटीमध्ये १८ मार्च या दिवशी दुपारी घडली.

ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेच्या अभ्यासक्रमात तब्बल २८ वर्षांनी पालट !

नव्या अभ्यासक्रमाच्या संदर्भात नवीन कार्यपद्धतीही लागू केली असून त्याची कार्यवाही वर्ष २०२५ पासून करण्यात येणार आहे.

एम्.ए.च्या प्रथम वर्षाच्या शिक्षणशास्त्र विषयातील एका पेपरचा निकाल १ वर्षानंतरही नाही !

शिक्षण विभाग याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना काढेल का ?

शहराबाहेर ‘पी.एम्.पी.एम्.एल्.’चे डेपो उभारणीच्या प्रस्तावांवर कोणताही निर्णय नाही !

सध्या शहरांमध्ये पी.एम्.पी.एम्.एल्.चे १५ डेपो असून काही नव्या डेपोंची आवश्यकता आहे. या बससेवेचा लाभ घेणारे बहुतांश प्रवासी शहराच्या हद्दीबाहेरचे आहेत.

राज्य पुरातत्व विभागाच्या साहाय्यक संचालकपदी जया वहाणे यांची नियुक्ती !

जया वहाणे यांनी १८ मार्चला त्यांच्या पदाचा कार्यभार स्वीकारला असून त्या यापूर्वी नागपूर विभागाच्या साहाय्यक संचालक म्हणून कार्यरत होत्या.

हिंदु जनजागृती समितीकडून कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडावर ‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ मोहीम !

या प्रसंगी ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधीकृती समिती’चे श्री. बाबासाहेब भोपळे यांनीही युवकांना मार्गदर्शन केले. हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेऊन इतिहासाचा जागर करत मोहिमेचा समारोप करण्यात आला.