‘कोल इंडिया लिमिटेड’ आस्थापनाचे तंत्रनिर्देशक (टेक्निकल डायरेक्टर) जितेंद्र मलिक यांची वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सनातनच्या आश्रमास सदिच्छा भेट !

‘कोल इंडिया लिमिटेड’ या शासकीय आस्थापनाचे तांत्रिक निर्देशक (टेक्निकल डायरेक्टर) श्री. जितेंद्र मलिक यांनी नुकतीच वाराणसी येथील सनातनच्या आश्रमास सदिच्छा भेट दिली.

महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आणि बंगाल या राज्यांमध्ये ग्रंथप्रदर्शनांचे आयोजन

सनातनचे आध्यात्मिक ग्रंथ, धर्मशिक्षणाचे फ्लेक्स फलक आणि सात्त्विक पूजासाहित्य यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाचा लाभ जिज्ञासूंनी मोठ्या प्रमाणात घेतला.

भारतीय स्टेट बँकेकडून श्री महालक्ष्मीदेवी मंदिराला ‘एल्.ई.डी. वॉल’ प्रदान !

भारतीय स्टेट बँकेकडून १५ मार्चला श्री महालक्ष्मीदेवी मंदिराला एक भव्य अद्ययावत ‘एल्.ई.डी. वॉल’(भक्तांना दर्शन होण्यासाठी लावण्यात आलेला डीजिटल फलक) प्रदान करण्यात आली आहे.

देशात समाज आणि संस्कृती टिकवण्यासाठी देवस्थानांचे रक्षण होणे अत्यावश्यक ! – डॉ. प्रभाकर कोरे, कार्याध्यक्ष, के.एल्.ई. संस्था, बेळगाव

कर्नाटक राज्यातील चिक्कोडी तालुक्यातील अंकलीमधील अनुभव मंटपात (सभागृहात) देवस्थान परिषद उत्साहात पार पडली !

युद्धाचा फतवा काढणार्‍या ‘दारूल उलूम देवबंद’वर तात्काळ बंदी घाला !

‘दारूल उलूम देवबंद’ने ‘गझवा-ए-हिंद’ (भारतावर आक्रमण) असा फतवा काढून भारतीय राज्यघटना, कायदे आणि सरकार यांना थेट आव्हान देऊन युद्धाची भाषा केली आहे.

पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर !

महापालिका आयुक्त तसेच प्रशासक विक्रम कुमार यांनी ११ सहस्र ६०१  कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले. भारतीय जनता पक्षाच्या महापालिकेतील कार्यकाळात मांडण्यात आलेल्या…

थेऊर येथील मंडल अधिकार्‍यांवर लाच स्वीकारल्याप्रकरणी गुन्हा नोंद !

भूमीच्या सातबारा उतार्‍यावरील कमी केलेले नाव पुन्हा सातबारा उतार्‍यावर लावण्यासाठी थेऊर येथील मंडल अधिकार्‍यांनी १० सहस्र रुपयांची मागणी केली.

पुणे महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीमध्ये ३०० कोटी रुपयांचे प्रस्ताव संमत !

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी २ टप्प्यांमध्ये झालेल्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये ३०० कोटी रुपयांच्या कामांचे १७५ पेक्षा अधिक प्रस्ताव संमत करण्यात आले.

१२५ कोटी रुपयांची फसवणूक करणार्‍या खुटे याची मालमत्ता शासनाधीन !

‘मल्टीलेव्हल मार्केटिंग’ योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची १२५ कोटी रुपयांची फसवणूक करणार्‍या विनोद खुटे याच्यावर कारवाई झाली असून अंमलबजावणी संचालनालयाने त्याची ३८ कोटी ५० लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

राज्यात मानवाकडून मैला उचलण्याची कामे बंद ! यंत्राद्वारेच स्वच्छता होणार !

राज्यात ‘मॅनहोलकडून मशीनहोलकडे’ ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. यासाठी ५०२ कोटी ४० लाख रुपये इतका निधी शासनाकडून संमत करण्यात आला आहे.