होळीसाठी कोकण रेल्वेमार्गावर ८ विशेष गाड्या

कोकणात होळी सणाला अनेक मुंबईकर गावी येत असतात, याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासन कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या चालवणार आहे.

दापोलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विकासकामांचे  भूमीपूजन

येथील श्री काळकाई मंदिर सभामंडप बांधकामासाठी २ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी संमत करण्यात आला आहे. या कामाचा शुभारंभ कोनशिलेचे उद्घाटन या वेळी करण्यात आले.

मिनियापोलीस (अमेरिका) येथील ‘इंटरनॅशनल नाईट’ या कार्यक्रमात भारतीय संस्कृतीचे दर्शन !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडाची प्रतिकृती आणि अयोध्या येथील प्रभु श्रीरामचंद्र यांच्या मंदिराची प्रतिकृती सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू !

दुप्पट तिकीट आकारून महाशिवरात्रीला घारापुरी येथे येणार्‍या भाविकांची आर्थिक लूट !

हिंदूंच्या सणांच्या वेळी आर्थिक लूट करणार्‍या महाराष्ट्र सागरी मंडळावर सरकार कारवाई करणार का ?

मराठा आरक्षणानुसार कोणतीही भरती ही न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून राहील !

मराठा आरक्षणानुसार कोणतीही नोकर भरती किंवा शैक्षणिक दाखले दिल्यास त्याविषयीचा निर्णय न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला सांगितले आहे.

शिक्षणासह संस्कारांचीही नितांत आवश्यकता ! – ह.भ.प. भागवताचार्य विश्वनाथ महाराज रिठे

आजच्या तरुणांना धर्माविषयी प्रेमच राहिलेले नाही, ही शोकांतिका आहे. यासाठी पालकांनी मुलांना कीर्तनाला जाऊन तेथे टाळ देणे, कीर्तन संपल्यावर तेथील बैठक व्यवस्था उचलून ठेवणे इत्यादी कृती करण्यास सांगू शकतो. त्यातून त्यांना हिंदु संस्कृतीची महानता लक्षात येऊन त्यांच्यावर चांगले संस्कार होऊ लागतील.

पोलिसांनी काळ्या सूचीतील गोशाळेकडे जनावरे सोपवलीच कशी ?

या प्रकरणात ‘गोवंश हत्याबंदी कायद्याचा गैरवापर होत आहे का ?, तसेच त्यामधील प्रावधानांचा अपलाभ घेऊन पोलिसांनी पकडलेली जनावरे पुन्हा कत्तलींसाठी नेण्यात येत आहेत का ?’, असे प्रश्न कुणाला पडल्यास चूक ते काय ?

मध्यप्रदेशाच्या मंत्रालयाच्या इमारतीला लागली आग !

मध्यप्रदेशाच्या येथील ‘वल्लभ भवन’ नावाच्या मंत्रालयाच्या इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर ९ मार्चच्या सकाळी भीषण आग लागली. आग विझवतांना येथे अग्नीशमनदलाचे दैनिक अडकले.

घारापुरी गुहेतील शिवपिंडीचे सहस्रावधी भाविकांनी घेतले दर्शन !

पुरातत्व विभागाने केंद्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यापूर्वी, तसेच युनेस्कोने ‘जागतिक वारसा’ म्हणून घोषित करण्याच्या आधीपासून हिंदूंचे प्राचीन धार्मिक स्थान असलेल्या घारापुरी गुहेतील शिवपिंडीचे महाशिवरात्रीच्या दिवशी सहस्रावधी भाविकांनी दर्शन घेतले.

लाच घेतांना ४ शासकीय कर्मचार्‍यांना अटक; एका साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा समावेश !

वस्तू आणि सेवा कर कार्यालयातील (जी.एस्.टी.) मालती कठाळे यांना ३ सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक करण्यात आली. तक्रारदार व्यावसायिकाने पत्नीच्या नावाने नवीन सेवा आणि कर क्रमांक घेण्यासाठी अर्ज केला होता. तो क्रमांक देण्यासाठी लाच घेण्यात आली.