अग्निशस्त्र आणि ५ जिवंत काडतुसे बाळगणार्‍या प्रवाशाला सोडून दिले !

आतंकवादी आक्रमणाची टांगती तलवार डोक्यावर असतांनाही लोकांच्या जिवाशी खेळणार्‍या अशा भ्रष्ट जवानांना कडक शासन हवे !

अंगणवाडीतील मुलांना पोषण आहारात कीडयुक्त धान्याचे वाटप !

येरवडा येथील जय जवाननगरमध्ये ‘एकात्मिक बाल विकास सेवा योजने’तील १११ क्रमांकाच्या अंगणवाडीतील २० ते २५ मुलांना काही महिन्यांपासून पोषण आहाराच्या नावाखाली कीड लागलेले निकृष्ट दर्जाच्या धान्याचे वाटप होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे.

मनोज जरांगेंसह २०० जणांवर गुन्हा नोंद !

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचा भंग केल्याच्या प्रकरणी मनोज जरांगेंसह २०० जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यावर आणखी १ गुन्हा नोंद !

बीड येथे विनापरवाना फेरी काढून ‘जेसीबी’ यंत्राने फुले उधळल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील आणि इतर १२ जण यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मागील १० दिवसांत जरांगे यांच्यावर हा तिसरा गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांच्यावर आतापर्यंत एकूण ५ गुन्हे नोंद झाले आहेत

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये परिचारिका नसल्याने उपचार करण्यास आधुनिक वैद्यांचा नकार !

रस्त्यावरून जात असतांना कुत्रा चावल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेले असता ‘रेबीज’ हे इंजेक्शन उपलब्ध नाही व आरोग्य केंद्रामध्ये ‘परिचारिका नसल्याने उपचार करू शकत नसल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी संगितले.

राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळेबुवा ऐकवणार रामकथा

कार्यक्रमाकरता सर्वांना विनामूल्य प्रवेश असून प्रतिवर्षीप्रमाणेच कीर्तनसंध्या महोत्सवाचा आस्वाद घेण्याचे आवाहन कीर्तनसंध्या परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

९ मार्चला मुख्यमंत्री शिंदे दापोलीत : विकासकामांचे होणार भूमीपूजन आणि सभा

खेड ते दापोली या प्रमुख राज्य मार्गासाठी ९८ कोटी रुपये संमत करण्यात आले असून विसापूर रस्त्यासाठी ३५ कोटी रुपयांचा निधी संमत झाला आहे.

ग्राहक पेठमधून महिलांना सकारात्मक ऊर्जा ! – सौ. युगंधरा राजेशिर्के

महिलादिनानिमित्त दैवज्ञ भवन येथे रत्नागिरी ग्राहक पेठ आयोजित महिला बचत गट, उद्योगिनींच्या वस्तू प्रदर्शन १० मार्चपर्यंत सकाळी ११.०० ते रात्रौ ८.३० या वेळेत सर्वांसाठी खुले रहाणार आहे.

जिल्ह्यातील १७ कातळशिल्पांच्या विकासकामांसाठी ८८ लाख रुपयांचा निधी संमत

१७ कातळशिल्पांच्या व्यवस्थापन आणि विकासकामाच्या ४ कोटी ३२ लाख १९ सहस्र १३६ इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

तिवरे धरणाची होणार पुनर्बांधणी : ६२ कोटी ७४ लाख रुपये संमत

धरणाचे काम पूर्णपणे चित्रीकरणात करण्यात यावे, तसेच संबंधित तज्ञ अधिकार्‍यांनी कामावर प्रतिदिन उपस्थित रहावे, असे स्पष्ट आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत.