काँग्रेसच्या एकाही सदस्याला काळ्या पाण्याची शिक्षा का झाली नाही ? – ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटातील संवाद

  • ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाचे विज्ञापन प्रदर्शित

  • प्रत्येक भारतियाला विचार करायला लावणारा चित्रपटातील संवाद !

मुंबई – भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील वीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा हिंदी आणि मराठी भाषेत चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यातील हिंदी भाषेतील चित्रपटाचा ट्रेलर (विज्ञापन) प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. चित्रपटातील संवाद आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भोगलेल्या कारागृहातील छळ यांचे चित्रण यात दाखवण्यत आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भूमिका रणदीप हुडा या अभिनेत्याने केली असून त्यांनी हा चित्रपट दिग्दर्शितही केला आहे. चित्रपटातील त्याच्या सावरकरांच्या भूमिकेची स्वागत होत आहे. त्यांच्या अभिनयाचे कौतुक केले जात आहे. हा चित्रपट २२ मार्चला ‘शहीद दिना’च्या पूर्वसंध्येला प्रदर्शित होणार आहे. २३ मार्च या दिवशी भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांना फाशी देण्यात आली होती. एकूण ३ मिनिटे २१ सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये भारताला स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या या कथेची झलक पाहून लोकांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे.

सौजन्य झी स्टुडिओ 

चित्रपटातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे काही संवाद

१. वर्ष १८५७ च्या युद्धात हिंदू आणि मुसलमान एकत्र लढले; कारण देश धर्माच्या वर आहे.

२. मॅझिनीने अखंड इटली निर्माण केला होता, आम्ही अखंड भारत घडवू.

३. एका प्रसंगात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पत्नी त्यांना म्हणतात, ‘समुद्राच्या पलीकडे जाणे अशुभ असू शकते.’ त्यावर सावरकर म्हणतात ‘हा महासागर भारतमातेचे पाय धुतो, संपूर्ण जग फिरवून मला तुमच्याकडे परत आणतो.’

४. मोहनदास गांधी सावरकर यांना म्हणतात, ‘हिंसेमुळे संघर्ष होऊ शकतो; मात्र समस्या सुटत नाही.’ यावर सावरकर म्हणतात, ‘मी अशा लोकांच्या शोधात आहे जे जिवंत ब्रिटिशांचे हृदय फाडतील आणि त्यांना खातील.’

५. आता चर्चा आणि बैठका यांची वेळ संपली आहे, आम्हाला येथून (ब्रिटनमधून) बंदुका भारतात पाठवाव्या लागतील आणि ब्रिटीश सैन्यातील आमच्या शीख बांधवांना लढ्यासाठी सिद्ध रहाण्यासाठी पत्र लिहावे लागेल.

६. वर्ष १९१२ पर्यंत इंग्रजांना मारून मारून भारतातून हाकलून लावू किंवा त्यांना मारता मारता हुतात्मा होऊ.

७. सुभाषचंद्र बोस यांना सावरकर म्हणतात, ‘जर्मनी आणि जपान यांची आधुनिक शस्त्रे वापरून इंग्रजांवर आक्रमण करा.’

८. इंग्रज भारतातून गेल्यानंतर पुन्हा येथे इस्लामी राजवट आणण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही मोगली राजवट येऊ देणार नाही.

९. सैन्यात भरती व्हा, बंदुका चालवण्याचे प्रशिक्षण घ्या. योग्य वेळच ‘त्या बंदुकाचे टोक कुणाकडे करायचे ?’, हे सांगेल.

१०. ‘हिंद’वर प्रेम करणारे आपण सगळे हिंदू आहोत. अखंड भारताचा विजय असो.

११. तुम्ही कधी विचार केला आहे का की, काँग्रेसच्या एकाही सदस्याला काळ्या पाण्याची शिक्षा का झाली नाही?

सामाजिक माध्यमांतून व्यक्त झालेल्या काही प्रतिक्रिया

१. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे वाघासारखे आहेत.

२. शेवटचा संवाद अप्रतिम आहे. २ मिनिटे १७ सेकंदाचा ट्रेलर पाहू अंगावर शहारे आले.