पैठण येथील ‘संत ज्ञानेश्वर उद्यान’ आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करावे !

पैठण येथील ‘संत ज्ञानेश्वर उद्याना’चा आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकास करावा. यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही’, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५ मार्च या दिवशी येथे दिली.

राज्य सरकारकडून गोशाळा विकसित करण्यासाठी आर्थिक साहाय्य !

‘गोवर्धन गोवंश समिती योजनेंतर्गत’ २०२३-२४  या वर्षामध्ये पात्र ठरलेल्या गोशाळांना हे अनुदान पशूसंवर्धन विभागांकडून दिले जाणार आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र गोसेवा आयोगा’चे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली.

पंचनाम्यात खाडाखोड असणे यांसह न्यायालयातील जबाब आणि प्रत्यक्ष पंचनामा यांत अनेक तफावती ! – अधिवक्ता समीर पटवर्धन

पंचनाम्यात अनेक नावे अपूर्ण आणि अर्धवट आहेत. पहिल्या पंचनाम्यात पंचांच्या नावाचा उल्लेख नाही. पंचनाम्यासाठी पोलिसांनी कोणती साधनसामुग्री घेतली ते पंचनाम्यात नमूद नाही यांसह अनेक गोष्टी अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी उलट तपासणीत न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या.

कु. मनाली शिंदे होमिओपॅथीच्या परीक्षेत राज्यात पाचवी !

नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतलेल्या होमिओपॅथीच्या परीक्षांमध्ये सनातनचे साधक आणि कोल्हापूर येथील प्रसिद्ध त्वचारोगतज्ञ डॉ. मानसिंग शिंदे यांची कन्या कु. मनाली शिंदे ही १ सहस्र ११३ गुण मिळवून राज्यात पाचवी आली आहे.

‘जोर मारणे’ स्पर्धेत सांगली येथील पैलवान शुभम चव्हाण प्रथम !

‘श्री समर्थ व्यायामशाळे’मध्ये दासनवमी उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवात गेल्या ५० वर्षांहून अधिक काळापासून पूर्वीपासून चालत आलेल्या जोर मारण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यात पैलवान शुभम चव्हाण याने १० मिनिटांत ३१० जोर मारून प्रथम क्रमांक पटकावला.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यावर आक्रमण करणार्‍यांचा मुख्य सूत्रधार शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी !

पू. संभाजीराव भिडेगुरुजींवर वेगवेगळ्या ठिकाणी काही समाजकंटकांकडून आक्रमणे करण्याचा, त्यांना त्रास देण्याचा, त्यांच्या गाड्या अडवण्याचा प्रकार होत आहे.

श्री रामदासनवमीच्या निमित्ताने ग्रंथ दिंडी आणि पालखी सोहळा !

ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आणि दासबोध मंडळ यांच्या वतीने ५ मार्चला श्री रामदासनवमीच्या निमित्ताने ग्रंथ दिंडी अन् पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने मिरज येथे कीर्तन महोत्सव, तसेच विविध कार्यक्रम !

समर्थभक्त गाडगीळ मित्र परिवार, काशीविश्वेश्वर ट्रस्ट यांच्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने काशी विश्वेश्वर देवालय येथे कीर्तन महोत्सव, तसेच विविध कार्यक्रम होत आहेत.

ग्रामीण भागातील आठवडी बाजारात बनावट नोटा बाळगणार्‍याला अटक !

अशांना कठोर शिक्षा केल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !

महाराष्ट्र गोसेवा आयोगात १६ जणांची नियुक्ती !

६ मार्च या दिवशी शासन आदेश काढून ८ शासकीय, तर ८ कंत्राटी कर्मचारी यांची नियुक्ती या आयोगावर करण्यात आली आहे.