वारकर्‍यांकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा सत्कार !

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजने’ला नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी मान्यता देण्यात आली असून आता या योजनेच्या माध्यमातून तीर्थक्षेत्रांना अनुमाने २ सहस्र कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे,

अमेरिकेत शीख संगीतकाराच्या हत्येला ५ दिवस उलटूनही शवविच्छेदन नाही !

परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेवरून अमेरिकी सरकारला जाब विचारला पाहिजे !

डॉ. दाभोलकरांची हत्या होण्यापूर्वी ते आदल्या रात्री आणि सकाळी कुठे होते ? हे सरकारी पक्ष सिद्ध करू शकलेला नाही ! – अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश पी.पी. जाधव यांच्या न्यायालयात चालू असून केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (‘सीबीआय’कडून) विशेष सरकारी अधिवक्ता प्रकाश सूर्यवंशी हे या वेळी उपस्थित होते.

राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण करणार्‍या पोलिसांवर कारवाई करा ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन

हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण करणारे राजवाडा पोलीस ठाण्यातील सर्व उत्तरदायी अधिकारी, पोलीस यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा सकल हिंदु समाज आंदोलन करेल, असे निवेदन सकल हिंदु समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांना देण्यात आले.

विधानभवनाच्या आवारात मंत्री-आमदार भिडले !

‘सत्ताधारी पक्षाच्या २ आमदारांमध्ये अशा प्रकारे वाद होत असेल, तर यातून त्यांची संस्कृती दिसून येत आहे’, अशी टीका विरोधकांनी केली आहे.

विधानसभेत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव !

भाजपचे आमदार राम कदम यांनी विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव मांडला. तालिका अध्यक्ष दीपक चव्हाण यांनी हा प्रस्ताव पुढील कारवाईसाठी विधानसभेच्या विशेषाधिकार भंग समितीकडे पाठवला आहे.

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांची कारागृहातून सुटका करण्याची मागणी !

या आंदोलनात श्री योग वेदांत सेवा समितीचे मुंबईतील विविध भागांतील एकूण ३५० हून अधिक साधक, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक या वेळी उपस्थित होते. उ.बा.ठा. गटाचे नवी मुंबईचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे हेही या वेळी उपस्थित होते.

ज्योतिबा देवस्थान प्राधिकरण स्थापन करण्यात येणार ! – अजित पवार

राज्याची आर्थिक स्थिती चांगली असून राज्याला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट निर्धारित वेळेत गाठण्यात येणार आहे. 

ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या प्रश्नावर त्वरित बैठक घ्यावी !- डॉ. नीलम गोर्‍हे, उपसभापती, विधान परिषद

२८ फेब्रुवारी या दिवशी विधान परिषदेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या प्रश्नावर त्वरित बैठक घेण्याचे निर्देश दिले.

पुणे शहरातील मिळकतदारांकडे ५ सहस्र १८२ कोटी रुपयांची थकबाकी !

‘कर भरणे हे कर्तव्य आहे’, हे आजपर्यंतच्या सरकारने किंवा प्रशासनाने नागरिकांना शिकवलेच नाही, त्याचा हा परिणाम !