नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील औषध दुकानांवर कारवाया !

औषध दुकानांमध्ये खरेदी-विक्रीचा ताळमेळ नसणे, औषधांची नोंदवही नसणे, फार्मासिस्ट नसणे, मुदतबाह्य, तसेच चिठ्ठीविना औषधांची विक्री करणे, फार्मासिस्टच्या अनुपस्थितीत औषधांची विक्री होणे, अशा कारणांवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

सांगली येथे इयत्ता १ लीतील मुलीशी गैरवर्तन करणार्‍या शिक्षकाला अटक !

विश्रामबाग येथील ‘महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी’च्या एका खासगी शाळेमध्ये इयत्ता १ लीमध्ये शिक्षण घेणार्‍या एका विद्यार्थिनीशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करणार्‍या शिक्षक संदीप पवार याला पोलिसांनी अटक केली आहे.

सनातन संस्‍थेचे सर्व उपक्रम समाजाचे आध्‍यात्‍मिक कल्‍याण करणारे ! – चेतन राजहंस, राष्‍ट्रीय प्रवक्‍ते, सनातन संस्‍था

सनातन संस्‍था ही आध्‍यात्‍मिक संस्‍था असून तिचे सर्व उपक्रम समाजाचे आध्‍यात्‍मिक कल्‍याण साध्‍य करणारे आहेत. सनातन संस्‍थेची २५ वर्षे, म्‍हणजे समाजाच्‍या आध्‍यात्‍मिक सेवेची २५ वर्षे आहेत.

‘कर्नाटक धार्मिक संस्‍था आणि धर्मादाय इलाखा सुधारणा विधेयक २०२४’ रहित करा !

कर्नाटक सरकारने २० फेब्रुवारी २०२४ या दिवशी ‘कर्नाटक धार्मिक संस्‍था आणि धर्मादाय इलाखा अधिनियम १९९७’ यात आणखी सुधारणा केल्‍या आहेत.

मुंबईत निवडणूक भरारी पथकाला ७२ लाख रुपयांची रक्कम सापडली

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने ७२ लाख ३९ हजार ६७५ रुपये रक्कम घाटकोपर पूर्व परिसरात एका गाडीतून पकडली. ही रक्कम प्राप्तीकर विभागाच्या कह्यात देण्यात आली आहे.

खासदार श्रीकांत शिंदे यांना तिसर्‍यांदा निवडून आणा ! – भाजप

खासदार श्रीकांत शिंदे यांना तिसर्‍यांदा निवडून आणण्यासाठी कल्याण मतदारसंघात सिद्धता करा, असे आवाहन भाजपचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पदाधिकार्‍यांना केले. नुकत्याच येथे झालेल्या मेळाव्यात त्यांनी वरील आवाहन केले.

आदर्श घोटाळा प्रकरणात अंबादास मानकापे याला सहाव्यांदा अटक !

आदर्श समूहाच्या घोटाळ्यातील ४ प्रमुख आरोपींना आर्थिक गुन्हे शाखेने ‘आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्थे’तील १३ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी पुन्हा अटक केली आहे. न्यायालयाने या आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

महाराष्ट्रातून ४५ जागा निवडून देणे महत्त्वाचे !

जागावाटपापेक्षा देशात महाविकास आघाडीला ४०० पेक्षा अधिक जागा कशा मिळतील. त्यासाठी महाराष्ट्रातून ४५ जागा कशा निवडून येतील हे पाहू. त्यामुळे वेळप्रसंगी त्याग करायला सिद्ध रहा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

१५ दिवसांची नोटीस दिल्याविना वीजजोड तोडू नये !

‘महावितरणने सरसकट वीजजोड तोडण्याची कारवाई करतांना या नियमाचे पालन करावे’, अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे; मात्र हे प्रावधान धाब्यावर बसवून परीक्षांच्या दिवसांत ग्राहकांना त्रास दिला जात आहे.

नागपूर येथे व्यंकटेश्वर महास्वामी यांच्याकडून प्रथम उमेदवारी आवेदन प्रविष्ट !

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील ५ मतदारसंघांत निवडणुका होणार आहेत. उमेदवारी आवेदन भरण्याच्या पहिल्याच दिवशी कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्याच्या चडचड येथील व्यंकटेश्वर महास्वामी उपाख्य दीपक कटकधोंड यांनी आवेदन प्रविष्ट केले आहे.