आदिवासी शाळांतील मुलांचे दूध आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात कोट्यवधी रुपयांचा अपहार !

राज्यातील आदिवासी शाळांमध्ये देण्यात येणार्‍या दुधात ८० कोटींचा आणि सामाजिक न्याय विभागाकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीच्या ‘पोषण आहारा’मध्ये २५० कोटी रुपयांचा अपहार झाला आहे, असा आरोप ‘शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस’चे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.

सातारा येथे बुलेटचालकांवर कारवाई !

येथील मोती चौकात कर्कश आवाजाचे सायलेन्सर असणार्‍या बुलेटचालकांवर सातारा पोलिसांनी कारवाई केली. गत काही दिवसांपासून शहरात कर्कश आवाजाचे सायलेन्सर असणारे बुलेटचालक सुसाट वेगाने बुलेट चालवत होते.

सोलापूर-अक्कलकोट महामार्गावरील बसथांब्यांच्या पाट्या काढून टाकल्याने गावातील प्रवाशांची गैरसोय !

सोलापूर-अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गाच्या नूतनीकरणामध्ये गावालगत असणार्‍या बस थांब्यांच्या पाट्या, तसेच काही ठिकाणी बसथांबे काढून टाकल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

निवडणूक कामकाज करणार्‍यांना रोकडविरहित वैद्यकीय सुविधा पुरवा ! – जिल्हाधिकारी

आगामी लोकसभा निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी यांना रोकडविरहित वैद्यकीय सुविधा पुरवण्यात याव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

कापूस व्यापारी अख्तर दस्तगीर पठाण आणि अलीम शहा यांच्यावर शेतकर्‍यांची २२ लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा !

नेहमीच स्वत:ला अल्पसंख्य म्हणवून घेणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य कसे ?

भगव्या ध्वजाचा आचारसंहितेशी संबंध काय ? – बापू ठाणगे,श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

नगर जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये भगवे ध्वज काढण्याचे काम पोलीस प्रशासन आणि निवडणूक शाखेकडून चालू झाले आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख बापू ठाणगे यांनी ‘भगव्या ध्वजाचा आचारसंहितेशी काय संबंध ?’, असा प्रश्न करत जिल्हाधिकार्‍यांना यासंबंधी निवेदन दिले आहे.

उष्णता निर्देशांकाचा आकडा घोषित करण्याची पद्धत अद्याप चालू नाही !

उष्णता निर्देशांक ३५ अंश सेल्सिअसपेक्षा न्यून, ३५ ते ४५ अंश, ४६ ते ५५ अंश आणि ५५ अंशांच्या पुढे अशा चार श्रेणी आहेत.

आध्यात्मिक, धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहास जाणून घेण्यासाठी मूर्ती अभ्यास आणि संशोधन आवश्यक ! – डॉ. जी.बी. देगलूरकर, मूर्तीशास्त्राचे जाणकार

मूर्तीशास्त्र हा दुर्लक्षित विषय असून विद्यापिठाने या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. मूर्तीचा खोलवर जाऊन अभ्यास केला, तरच आपला जाज्वल्य इतिहास समोर येणार आहे.

धरणांतील जलसाठा ४० टक्क्यांवर !

राज्यातील एकूण धरणांपैकी अंदाजे ४० जलसाठे पूर्णपणे कोरडे पडले असून १८ हून अधिक धरणांमध्ये १० टक्क्यांहून न्यून पाणीसाठा शिल्लक आहे. सर्वत्रची एकूण परिस्थिती पहाता सर्वच धरणांत सरासरी ४० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना साहाय्य केल्याने पारितोषिक मिळाले ! – आदित्य ठाकरे, ठाकरे गट

घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील कंत्राटदारांना मुंबई लुटण्यासाठी साहाय्य केल्याविषयी मिळालेले हे पारितोषिक आहे’, अशी टीका ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वरून केली.