मुंबईतील ८ ब्रिटीशकालीन रेल्वेस्थानकांचे नामांतर !

१३ मार्च या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये मुंबईतील ८ ब्रिटीशकालीन रेल्वेस्थानकांचे नामांतर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या मंत्रीमंडळाच्या बैठकीत एकूण २८ निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

केंद्र सरकारने राज्यघटनात्मक मार्गाने भारताला हिंदु राष्ट्र घोषित करावे ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

घटनात्मक व्यवस्थेत बहुमताला प्राधान्य असते आणि त्यानुसार राज्यव्यवस्था बनवण्याचे प्रावधान (तरतूद) असते. भारतीय राज्यघटनेत ‘अनुच्छेद ३६८ ब’ यात हे प्रावधान आहे.

अहमदनगर जिल्ह्याच्या ‘अहिल्यानगर’ नामकरणाला मंत्रीमंडळाची मान्यता !

अहमदनगर शहर आणि जिल्हा यांचे नामकरण ‘अहिल्यानगर’ असे करण्यास मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. १३ मार्चला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. याविषयी अनेक लोकप्रतिनिधी, नागरिक आणि संघटना यांनी राज्यशासनाकडे मागणी केली होती.

विनय केळकर आणि किरण कांबळे हे दोन खोटे साक्षीदार ‘सीबीआय’ने उभे केले ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात साक्षीदार विनय केळकर आणि किरण कांबळे यांनी मुख्य संशयित शरद कळसकर अन् सचिन अंदुरे यांनी ओळखले आहे, असा दावा ‘सीबीआय’ने केला आहे.

पुणे येथील ‘ओला’ आणि ‘उबेर’ यांचा परवाना रहित !

‘ऑनलाईन’ प्रवासी वाहतूक क्षेत्रातील ‘ओला’ आणि ‘उबर’ या आस्थापनांना प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने अनुमती नाकारली आहे. राज्य सरकारचे ‘मोटार वाहन समुच्चय’ (अ‍ॅग्रीगेटर) धोरण नसल्याने या आस्थापनांनी केंद्र सरकारच्या धोरणांतर्गत हे अर्ज केले होते.

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : मंत्रालय स्वच्छ आणि नीटनेटके ठेवण्यासाठी राज्यशासनाने आदेश काढला !

दैनिक ‘सनातन प्रभात’मधील वृत्त आणि सुराज्य अभियानाची तक्रार यांवर कार्यवाही करत राज्यशासनाने ११ मार्च या दिवशी मंत्रालयाच्या स्वच्छतेसाठी शासन आदेश काढला आहे.

चिकलठाणा (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथे हनुमात मंदिरात आरती चालू असतांना ६० धर्मांध मुसलमानांचा हैदोस !

धर्मांधांच्या अशा घटनांविषयी काँग्रेस, साम्यवादी पक्ष, समाजवादी पक्ष, बसप, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी किंवा इस्लामी संघटना तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून निवडणूक रोख्यांची सर्व माहिती निवडणूक आयोगाला सादर

ज्या गोष्टीला ४ मास लागणार, असे सांगणारी एस्.बी.आय. अवघ्या ४८ घंट्यांत तीच माहिती सादर करू शकते, हे कसे काय ?

(म्हणे) ‘३ कोटी लोकांना भाजपवाले स्वतःच्या घरी ठेवणार आहेत का ?’

इस्लामी देशांत हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांवर केजरीवाल यांना कधी बोलावेसे का वाटत नाही ? कि त्यांना ते ‘हिंदू’ आहेत म्हणून बोलावेसे वाटत नाही ?

२ सहस्र भारतीय डॉक्टर ब्रिटनला जाणार !

इंग्लंडमधील नॅशनल हेल्थ सर्व्हिसमध्ये (एन्.एच्.एस्.मध्ये) डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यासाठी भारतातून २ सहस्र डॉक्टर पाठवले जाणार आहेत