गांधीवाद्यांची आत्मघातकी अहिंसा !

‘राम आणि कृष्ण यांच्या युगांत गांधीवादी असते, तर त्यांनी राम-कृष्ण यांनाही अहिंसावाद शिकवण्याचा प्रयत्न केला असता आणि रावण अन् कंस यांना जिवंत ठेवले असते. त्यामुळे हिंदू नष्टच झाले असते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

(म्हणे) ‘बेरोजगारीमुळे अमोल आणि त्याच्या साथीदारांनी केले प्रतिकात्मक आंदोलन !’ – अधिवक्ता असीम सरोदे

नक्षलवादाची चळवळ अशाच प्रकारच्या उद्देशाने सशस्त्र झाली, हे देशाला ठाऊक आहे. सरोदे अशांचे समर्थन करत आहेत, हेच यातून लक्षात येते !

जुने निवृत्ती वेतन लागू करण्याचा निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेऊ ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

‘जुने निवृत्ती वेतन लागू करण्याविषयी शासन सकारात्मक असून कर्मचारी संघटनांनी संप त्वरित मागे घ्यावा’, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी या वेळी केले.

स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही हिंदूंच्या समस्यांची सूची मोठी ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

मिरज येथील हिंदूसंघटन मेळाव्यासाठी १५० हून अधिक धर्मप्रेमींची उपस्थिती !

पाणीवाटपाचा प्रश्न सोडवण्यासाठी कर्नाटकशी चर्चा करण्यास सिद्ध ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

कोयना धरणामध्ये १४ टी.एम्.सी. पाणी अल्प आहे. आम्ही नदी कोरडी पडू देणार नाही. सीमाविषयक प्रश्न असला, तरी पाण्यासाठी महाराष्ट्र नेहमीच कर्नाटकला सहकार्य करतो; परंतु आमच्या हक्काच्या पाण्यासाठी त्या राज्याची भूमिका सहकार्याची नसते.

शाळेतील ‘सखी सावित्री समिती’मध्ये महिला आमदारांना सामावून घेऊ ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री 

शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि पालकांचे समुपदेशन करण्यासाठी स्थापन केलेल्या ‘सखी सावित्री समिती’च्या कार्यामध्ये महिला आमदार यांना सामावून घ्यावे अशी सूचना उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी केली होती.

जेजुरीच्या खंडोबा गडावर शंकराचार्यांच्या हस्ते घटस्थापना !

जेजुरीच्या खंडोबा गडावर १३ डिसेंबर या दिवशी करवीर पिठाचे शंकराचार्य श्री नृसिंह भारती यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. सनई चौघड्याच्या मंगलमय सुरात सकाळी साडेअकरा वाजता गडामधील नवरात्र महालात श्री खंडोबा म्हाळसादेवींच्या मूर्ती आणून वेदमंत्राच्या जयघोषात घटस्थापना करण्यात आली.

५ लाख भाविकांच्या उपस्थितीत श्री सिद्धनाथ रथोत्सव साजरा !

‘सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं’ या गजरामध्ये ५ लाख भाविकांच्या उपस्थितीमध्ये श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांचा रथोत्सव पार पडला. या वेळी भाविकांकडून रथावर गुलाल-खोबर्‍याची उधळण करण्यात आली.

राज्यातील अपात्र शाळांनी निकषांची पूर्तता करावी ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

आमदार विक्रम काळे यांनी ‘विनाअनुदानित आणि अंशत: अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा अन् वर्ग तुकड्यांना प्रचलित अनुदान देण्याविषयीचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.