मालदीव भारतासमवेतचा ‘हायड्रोग्राफिक’ सर्व्हेक्षण करार संपवणार !

माले (मालदीव) – मालदीव सरकारने भारतासमवेतचा ‘हायड्रोग्राफिक’ सर्व्हेक्षण करार संपवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने या कराराचे नूतनीकरण न करण्याचा निर्णय घेतला. कराराची मुदत ७ जून २०२४ या दिवशी संपणार आहे. मालदीवने बेटांच्या पाण्यावर संशोधन करण्यासाठी वर्ष २०१९ मध्ये हा करार करण्यात आला होता. या अंतर्गत भारताला मालदीव बेटांचे पाणी, खडक, सरोवर, किनारपट्टी, सागरी प्रवाह आणि भरती-ओहोटी यांचा अभ्यास करण्याची अनुमती देण्यात आली होती. भारताने आतापर्यंत या कराराच्या अंतर्गत सर्वेक्षणाचे ३ टप्पे पूर्ण केले आहेत.

सौजन्य भारत तक 

मालदीवमध्ये चीन समर्थक महंमद मुइज्जू यांचा निवडणुकीत विजय होऊन ते राष्ट्रपती झाल्यावर त्यांनी भारतविरोधात निर्णय घेण्यास प्रारंभ केला आहे. यापूर्वी त्यांनी मालदीवमध्ये भारतीय सैन्याला निघून जाण्याचा आदेश दिला आहे.

संपादकीय भूमिका 

चीन समर्थक राष्ट्रपतींमुळे मालदीवकडून सातत्याने भारतविरोधी निर्णय घेतले जाणार, यात आश्‍चर्य नाही. अशा स्थितीत भारताने मालदीवचे नाक दाबण्याचा प्रयत्न केला पाहिजे !