
पुणे – नारायणगाव परिसरात अवैध वास्तव्य करणार्या ८ बांगलादेशी नागरिकांना राज्य आतंकवादविरोधी पथकाने (‘ए.टी.एस्.’ने) १४ डिसेंबर या दिवशी पकडले. अवैध वास्तव्य केल्याप्रकरणी ८ बांगलादेशी नागरिकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांची ए.टी.एस्.कडून चौकशी करण्यात येत आहे. मेहबुल शेख, राणा मंडल, गफूर शेख, आलमगीर मंडल, शालोम मंडल, अफजल खान, कबीर मुल्ला आणि जमातअली मंडल, अशी त्यांची नावे आहेत. प्राथमिक चौकशीत या बांगलादेशी नागरिकांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात घुसखोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. (बांगलादेशी घुसखोरांना आधारकार्ड, शिधापत्रिका आदी कागदपत्रे आपल्याकडीलच भ्रष्ट व्यवस्था उपलब्ध करून देते, हे सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर आहे. यासह घुसखोर खोटी कागदपत्रे बनवून घेतात, याचा पोलीस किंवा प्रशासन यांना थांगपत्ताही लागत नाही, हे संतापजनक आहे ! – संपादक) हे घुसखोर नारायणगाव परिसरात मजुरी करत असल्याची माहिती अन्वेषणात मिळाली आहे.
बांगलादेशी घुसखोरांची वाढती संख्या आणि आतंकवाद्यांच्या कारवाया, यांमुळे सामान्य नागरिकांसाठी असुरक्षित बनलेले पुणे !
आठवड्यापूर्वी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए.) आणि ‘ए.टी.एस्.’ने पुणे आणि ठाणे परिसरात कारवाई करून इसिसच्या आतंकवादी विचारधारेचा प्रसार करणार्या १५ जणांना कह्यात घेतले होते. या प्रकरणात कोंढव्यातील दोघांची चौकशी करण्यात आली होती. ३ मासांपूर्वी पुणे पोलिसांनी बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत कारवाई करून बांगलादेशी महिलांसह त्यांच्या साथीदारांना कह्यात घेतले होते. अवैध वास्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
संपादकीय भूमिका
|
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भिगवण (पुणे) येथे अल्पवयीन मुलीला धमक्या देत विनयभंग !
तुळापूर (आळंदी) येथील ‘विश्वसंस्कृती’ इमारतीतील अनधिकृत ‘प्रोजेक्ट एक्स’ मेजवानीवर पोलिसांची धाड !
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !