छत्तीसगडमध्ये मतदानाच्या वेळी पोलीस पथकावर नक्षलवाद्यांकडून आक्रमण !

नक्षलवादाची कीड आता शेवटची घटका मोजत आहे. त्यामुळे तिच्यावर जोरकसपणे आक्रमण करून ती नष्ट करणेच आवश्यक !

ताजमहाल परिसरात मुसलमान पर्यटकाने नमाजपठण केल्याने हिंदु महासभेकडून विरोध !

ताजमहाल हा हिंदूंचा वारसा आहे, हे पुरातत्व विभाग घोषित का करत नाही ?केंद्र सरकारने या संदर्भात पुढाकार घेऊन ताजमहालचे सत्य जगाला सांगितले पाहिजे !

इस्रायल-हमास युद्धातील नागरिकांच्या मृत्यूचा मी निषेध करतो ! – पंतप्रधान मोदी

दुसर्‍या ‘व्हॉइस ऑफ ग्लोबल’ शिखर संमेलनाचे उद्घटनाच्या वेळी ते बोलत होते.

मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीशी संबंधित १६ याचिकांवरील निर्णय उच्च न्यायालयाने राखून ठेवला

अधिवक्ता आयुक्तांच्या माध्यमांतून जन्मभूमी परिसराचे सर्वेक्षण करण्याचा आदेश द्यायचा ? कि वर्ष १९९१ च्या धार्मिक स्थळ कायद्यांतर्गत खटल्याची सुनावणी आधी करायची ?, हे न्यायालय ठरवणार आहे.

हमासने केलेला इस्रायलींचा नरसंहार योग्यच ! – ५७.५ टक्के अमेरिकी मुसलमानांचे मत

इस्रायलच्या आक्रमणांवर टीका करणारे हमासकडून केल्या जाणार्‍या नरसंहाराविषयी चकार शब्द काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

सिंधुदुर्ग : मालवण येथे पारंपरिक मासेमारांचे उपोषण चालू 

अवैधरित्या मासेमारी करणार्‍या यांत्रिक नौकांवर (पर्ससीन नौका) कारवाई करण्यासह अन्य मागण्यांसाठी पारंपरिक मासेमारांनी मत्स्य विभागाच्या येथील कार्यालयासमोर उपोषण चालू केले आहे.

Goa Proposal For Third District : राज्यात तिसरा जिल्हा निर्माण करण्याचा प्रस्ताव !

राज्यात तिसर्‍या जिल्ह्याच्या निर्मितीच्या अनुषंगाने सरकारने ७ सदस्यीय अभ्यास समितीची स्थापना ! अभ्यास समिती ३ मासांच्या समयमर्यादेत तिचा अहवाल सरकारला सुपुर्द करणार आहे. राज्यात सध्या उत्तर आणि दक्षिण, असे दोन जिल्हे आहेत.

National Press Day – पत्रकारांनी जनहिताच्या दृष्टीने अशासकीय संस्थांवरही लिहावे ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

‘‘पत्रकारांनी सरकारच्या चुका दाखवाव्यात. दाखवलेल्या चुका सुधारण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत असते.’’ कार्यक्रमाच्या प्रारंभी गोवा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजतिलक नाईक यांनी पत्रकारांपुढील समस्यांचे कथन केले.

54th IFFI 2023 : चित्रपट नगरीसाठी गोवा मनोरंजन संस्था भूमी ‘लिज’वर घेणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोव्यात २० ते २८ नोव्हेंबर या कालावधीत ५४ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (आंचिम) होणार आहे. या पार्श्वभूमीवर गोवा मनोरंजन संस्थेने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्‍या १०५ शाळांमध्‍ये केवळ ८ क्रीडा शिक्षक, तसेच क्रीडा साहित्‍याचा अभाव !

महापालिकेच्‍या १०५ शाळांमध्‍ये केवळ ८ क्रीडा शिक्षक आहेत. २२ शाळांना मैदान नाही, तर १७ शाळांची मैदाने छोटी असून ती अपुरी पडत आहेत. अनेक शाळांमध्‍ये क्रीडा साहित्‍यही उपलब्‍ध नाही.