प्रयागराज (उत्तरप्रदेश) – अलाहाबाद उच्च न्यायालयाने मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीच्या संदर्भातील सर्व १६ याचिकांवर सुनावणी पूर्ण करत निर्णय राखून ठेवला आहे. अधिवक्ता आयुक्तांच्या माध्यमांतून जन्मभूमी परिसराचे सर्वेक्षण करण्याचा आदेश द्यायचा ? कि वर्ष १९९१ च्या धार्मिक स्थळ कायद्यांतर्गत खटल्याची सुनावणी आधी करायची ?, हे न्यायालय ठरवणार आहे. उच्च न्यायालय एकाच वेळी मथुरा जिल्हा न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेल्या १६ याचिकांवर सुनावणी करत आहे. या याचिकांत शाही ईदगाह मशीद, उत्तरप्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड, श्रीकृष्णजन्मभूमी सेवा संघ आणि श्रीकृष्णजन्मभूमी संघ हे पक्षकार आहेत.