इस्रायल-हमास युद्धातील नागरिकांच्या मृत्यूचा मी निषेध करतो ! – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी देहली – पश्‍चिम आशिया प्रदेशात घडणार्‍या घटनांमुळे नवीन आव्हाने उभी रहात आहेत. भारताने ७ ऑक्टोबर या दिवशी इस्रायलवर झालेल्या आक्रमणाचा निषेध केला. आम्ही संयम ठेवला आहे. आम्ही संवाद आणि मुत्सदेगीरी यांवर भर दिला आहे. आम्ही इस्रायल-हमास युद्धात सामान्य नागरिकांचा मृत्यूचा निषेध करत आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. दुसर्‍या ‘व्हॉइस ऑफ ग्लोबल’ शिखर संमेलनाचे उद्घटनाच्या वेळी ते बोलत होते.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, आम्ही पॅलेस्टिनी राष्ट्रपती महमूद अब्बास यांच्याशी संवाद साधल्यानंतर पॅलेस्टिनी लोकांना साहित्य पाठवले आहे. हीच वेळ आहे ‘ग्लोबल साऊथ’च्या लोकांनी एकत्र यायला हवे. (‘ग्लोबल साऊथ’ हा मुख्यतः आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका खंडांमध्ये पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात स्थित देशांचा समूह आहे, येथे आर्थिक विकास होत आहे.)