धमतरी (छत्तीसगड) – छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी ७० जागांवर मतदान झाले. या वेळी येथे येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पथकावर नक्षलवाद्यांनी आक्रमण केले. नक्षलवाद्यांनी या पथकाच्या ठिकाणी बाँबस्फोट घडवले. या स्फोटात कोणतीही जीवित हानी झाली नाही. राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर बस्तरमध्ये अनेक ठिकाणी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करणारे फलक आणि पत्रके सापडली होती.
संपादकीय भूमिकानक्षलवादाची कीड आता शेवटची घटका मोजत आहे. त्यामुळे तिच्यावर जोरकसपणे आक्रमण करून ती नष्ट करणेच आवश्यक ! |