इचलकरंजी (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथे ‘माणुसकीची भिंत’ उपक्रमास उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद !

दिवाळी सणाच्‍या पार्श्‍वभूमीवर गोरगरीब आणि गरजू नागरिक यांना साहाय्‍याचा हात पुढे करण्‍यासाठी ‘व्‍हिजन इचलकरंजी’च्‍या वतीने ३ दिवस ‘माणुसकीची भिंत’ हा उपक्रम राबवण्‍यात आला.

जनतेला स्वार्थ बाळगायला न‍ाही, तर त्याग करायला शिकवा !

‘राजकारणी जनतेला ‘हे देऊ, ते देऊ’, अशी आश्वासने देऊन स्वार्थी बनवतात, तर साधक जनतेला सर्वस्वाचा त्याग करायला शिकवतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु मतपेढी सिद्ध व्‍हायला हवी ! – कालीचरण महाराज

कालीचरण महाराज हे वर्ष २०२४ च्‍या लोकसभा निवडणुकीत धाराशिव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील, अशी चर्चा चालू आहे. याविषयी कालीचरण महाराजांना पत्रकारांनी विचारले असता ते म्‍हणाले, ‘‘मी धर्माच्‍या नावावर हिंदूंना एकत्रित आणण्‍याचे कार्य करत आहे.

पुष्‍करतीर्थ (राजस्‍थान) येथील पुरोहित संघाच्‍या पदाधिकार्‍यांची हिंदु जनजागृती समितीसह बैठक

हिंदु जनजागृती समितीची पुष्‍कर पुरोहित संघाच्‍या पदाधिकार्‍यांसमवेत नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत समितीच्‍या धर्मकार्याविषयी मध्‍यप्रदेश आणि राजस्‍थान समन्‍वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी माहिती दिली.

कुपवाडा (जम्‍मू-काश्‍मीर) येथे मुख्‍यमंत्र्यांच्‍या हस्‍ते छत्रपती शिवरायांच्‍या अश्‍वारूढ पुतळ्‍याचे अनावरण !

कुपवाडा (जम्‍मू-काश्‍मीर) येथे बसवण्‍यात आलेल्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या अश्‍वारूढ पुतळ्‍याचे अनावरण ७ नोव्‍हेंबर या दिवशी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. दिवाळी सणाच्‍या पार्श्‍वभूमीवर मराठा बटालियन असल्‍याने मुख्‍यमंत्री शिंदे यांनी सैनिकांसमवेत दिवाळी साजरी केली.

पराक्रमी योद़्‍ध्‍यांकडून धर्माचरणाचे महत्त्व शिकणे आवश्‍यक ! – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज आदी महान योद़्‍ध्‍यांनीही एकलिंगजी आणि भवानीमाता यांची पूजा केली. त्‍यांना जीवनातील दैवी शक्‍तीचे महत्त्व ठाऊक होते. त्‍याप्रमाणे आपणही हिंदु असल्‍याने धर्माचरण करणे आणि ते शिकणे आवश्‍यक आहे…

मुंबई विद्यापिठाच्‍या कुलगुरूंना घेराव, विदुषकाचे मास्‍क घालण्‍याचा प्रयत्न !

मुंबई विद्यापिठाच्‍या पदवीधर मतदारसंघाच्‍या सिनेट निवडणुकीवरून विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्‍या आहेत. सिनेट निवडणूक मतदारसूची आणि निवडणुकीच्‍या सूत्रावरून महाराष्‍ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने मुंबई विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. रवींद्र कुलकर्णी यांना घेराव घातला.

मदरशातील हिंदु विद्यार्थी !

देशातील प्रत्‍येक मदरशात हिंदु मुलांचे प्रवेश झाले आहेत का ? ते शोधून त्‍वरेने त्‍यांना योग्‍य शाळेत पाठवले पाहिजे !

भ्रष्‍टाचार मुक्‍तता !

विविध कामांच्‍या निमित्ताने पंचायत समितीत येणार्‍या लोकांकडून कागदपत्रांवर पुढील प्रक्रिया जलद होण्‍यासाठी शासकीय अधिकार्‍यांना अनेकदा प्रलोभने देण्‍याचे प्रकार होतात.

न्‍यायालयांनी अशांना शिक्षा केली पाहिजे !

कोणत्‍याही ग्रंथावर विधान करतांना वास्‍तविक संदर्भ पाहूनच ते केले पाहिजे. काही वेळा असत्‍य विधान होऊ शकते,