इचलकरंजी (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथे ‘माणुसकीची भिंत’ उपक्रमास उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद !

‘माणुसकीची भिंत’ उपक्रमाप्रसंगी ‘व्‍हिजन इचलकरंजी’चे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते 

इचलकरंजी (जिल्‍हा कोल्‍हापूर) – दिवाळी सणाच्‍या पार्श्‍वभूमीवर गोरगरीब आणि गरजू नागरिक यांना साहाय्‍याचा हात पुढे करण्‍यासाठी ‘व्‍हिजन इचलकरंजी’च्‍या वतीने ३ दिवस ‘माणुसकीची भिंत’ हा उपक्रम राबवण्‍यात आला. या उपक्रमात शहर आणि परिसरातील नागरिकांकडून उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात नागरिकांकडून कपडे जमा करण्‍यात आले आणि जमा झालेले कपडे, तसेच इतर साहित्‍य सायंकाळच्‍या सुमारास गरजूंना वाटप करण्‍यात आले. ‘व्‍हिजन इचलकरंजी’च्‍या वतीने वर्ष २०१६ पासून हा उपक्रम राबवण्‍यात येत आहे.

‘नको असेल ते द्या आणि हवे असेल ते घेऊन जा’, या घोषवाक्‍याखाली हा उपक्रम चालू आहे. या उपक्रमात व्‍यंकटराव हायस्‍कूलचे मुख्‍याध्‍यापक ए.ए. खोत, भाजपचे शहराध्‍यक्ष अमृतमामा भोसले, ‘व्‍हिजन इचलकरंजी’चे अध्‍यक्ष कौशिक मराठे, उपाध्‍यक्ष इराण्‍णा सिंहासने, खजिनदार अशोक पाटणी, सचिव विजय पाटील, अमित कुंभार यांसह अनेक मान्‍यवर सहभागी होते. या उपक्रमात नागरिकांनी कपडे, खेळणी, फराळ यांसह इतर साहित्‍य जमा केले, तसेच सायंकाळपर्यंत ते वाटपही करण्‍यात आले होते.