हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अजमेर (राजस्थान) येथील राजपूत वसतीगृहामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

अजमेर (राजस्थान) – महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज आदी महान योद़्ध्यांनीही एकलिंगजी आणि भवानीमाता यांची पूजा केली. त्यांना जीवनातील दैवी शक्तीचे महत्त्व ठाऊक होते. त्याप्रमाणे आपणही हिंदु असल्याने धर्माचरण करणे आणि ते शिकणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश अन् राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी केले. येथील राजपूत वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी श्री. भंवरसिंग राठोड यांनी फ्लेक्स प्रदर्शनाद्वारे उपस्थितांना धर्मशिक्षणाची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी राजपूत वसतिगृहाचे सर्वश्री सुकरसिंग शेखावत, महावीरसिंह गौड, भेरुसिंह राठोड, नरेंद्रसिंह राठोड यांचे सहकार्य लाभले.
श्री. जाखोटिया पुढे म्हणाले, ‘‘ऋषिमुनींनी आपल्याला धर्माचरणाची शिकवण दिली. त्यावर आता संशोधन केले जात आहे. या धर्माचरणाचे सकारात्मक लाभ वैज्ञानिक चाचण्यांमध्ये समोर येत आहेत. आजच्या धकाधकीच्या परिस्थितीत आपण आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि सकारात्मक रहाण्यासाठी आध्यात्मिक साधना केली पाहिजे.’’
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन