सर्वोच्च न्यायालयाने मणीपूर सरकारकडे उत्तर मागितले

मणीपूर सरकारने देशातील संपादकांची संघटना असलेल्या ‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’विरुद्ध नोंदवला आहे.

ओंकारेश्वर मंदिरातील संतांना भूमीत श्री हनुमानाची मूर्ती असल्याचा स्वप्नदृष्टांत !

‘उत्खननात श्री हनुमानाची दोन ते अडीच फूट उंचीची मूर्ती सापडेल’, असे या संतानी सांगितले. उत्खननाच्या वेळी मूर्ती दिसू लागली.

जोपर्यंत समाजात भेदभाव आहे, तोपर्यंत आरक्षण राहिले पाहिजे ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

आरक्षण हे काही आर्थिक आणि राजकीय बरोबरीपुरते मर्यादित नाही, तर ते सामाजिक बरोबरी आणि मान मिळणे, यांसाठी आहे. त्यामुळे राज्यघटनासंमत आरक्षणाचे संघाने नेहमीच समर्थन केले आहे.

आतंकवाद्यांच्या आक्रमणात पाकचे ११ सैनिक ठार

पाकिस्तानच्या खैबर-पख्तूनख्वा प्रांतातील चित्राल जिल्ह्यातील अफगाणिस्तानच्या सीमेवरील २ चौक्यांवर ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ या आतंकवादी  संघटनेने केलेल्या आक्रमणात पाकचे ११ सैनिक ठार घायाळ झाले.

खलिस्‍तानी आतंकवाद संपवण्‍यासाठी ब्रिटन भारतासमवेत ! – पंतप्रधान ऋषी सुनक

ऋषी सुनक यांनी असे केवळ म्‍हणू नये, तर प्रत्‍यक्ष कृती करावी, असेच भारताला वाटते !

निजामकालीन नोंदींवरून मराठ्यांना कुणबी जातीचे आरक्षण लागू करण्यास सरकार सहमत !

अंतरवाली सराटी येथील ३ सहस्र ३३२ आंदोलकांवर चुकीच्या पद्धतीने प्रविष्ट केलेले गंभीर गुन्हे मागे घेण्याचे आश्‍वासनही सरकारने दिले आहे.

(म्हणे) ‘मंदिरात काही जणांनाच शर्ट काढून प्रवेश देणे, ही अमानवीय प्रथा असून देवासमोर सर्व जण समान आहेत !’-काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या

 शास्त्र, प्रथा-परंपरा यांविषयी काडीचेही ज्ञान नसणारे आणि हिंदु धर्मावर विश्‍वास नसणारेच असे विधान करू शकतात ! अशांच्या बोलण्याकडे कोण लक्ष देणार ?

अतिरिक्‍त पोलीस महासंचालकांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली !

जिल्‍ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर लाठीमार आणि दगडफेकीची घटना घडली होती. या घटनेची चौकशी करण्‍याचे आदेश राज्‍य सरकारने दिले आहेत. त्‍याचे दायित्‍व अतिरिक्‍त पोलीस महासंचालक संजय सक्‍सेना यांच्‍यावर देण्‍यात आले आहे.

मनोज जरांगे यांच्‍याशी चर्चा अयशस्‍वी, जरांगे यांनी पुन्‍हा दिली ४ दिवसांची मुदत !

मराठवाड्यातील मराठा समाजाला विदर्भाप्रमाणे कुणबी प्रमाणपत्राद्वारे ओबीसी आरक्षण द्या, यासह इतर मागण्‍यांसाठी अंतरवाली सराटी येथे गेल्‍या ८ दिवसांपासून चालू असलेल्‍या बेमुदत उपोषणावर तोडगा काढण्‍यात सरकारला ५ सप्‍टेंबर या दिवशी अपयश आले आहे.

जालना पोलीस अधीक्षकपदी शैलेश बलकवडे यांची नियुक्‍ती !

जालना जिल्‍ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. त्‍यांनी ४ सप्‍टेंबर या दिवशी कार्यभार हाती घेतला. ‘सर्वसामान्‍य माणूस म्‍हणून मी काम करतो. मी अंतरवाली सराटी या गावात जाणार असून आंदोलक मनोज जरांगे यांना भेटणार आहे. आंदोलक आणि पोलीस यांच्‍यामध्‍ये झालेले मतभेद दूर करणार आहे’, असे ते म्‍हणाले.