ओंकारेश्वर मंदिरातील संतांना भूमीत श्री हनुमानाची मूर्ती असल्याचा स्वप्नदृष्टांत !

प्रत्यक्ष उत्खननात मूर्ती सापडली !

ओंकारेश्वर मंदिर

विदिशा (मध्यप्रदेश) – ओंकारेश्वर मंदिरातील संतांना भूमीत श्री हनुमानाची मूर्ती असल्याचा स्वप्नदृष्टांत झाला. त्यानुसार येथील धरगा गावात स्थानिक लोकांनी उत्खननाचे काम चालू केले. ‘उत्खननात श्री हनुमानाची दोन ते अडीच फूट उंचीची मूर्ती सापडेल’, असे या संतानी सांगितले. उत्खननाच्या वेळी मूर्ती दिसू लागली. तथापि या वेळी स्थानिक पोलीस, प्रशासन, महसूल विभाग आणि वनविभाग यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे पोलिसांनी उत्खननाचे काम थांबवले.

संताच्या स्वप्नदृष्टांतानुसार, भूमीत मूर्ती सापडल्याने धरगा गावातील लोकांनी त्या ठिकाणी पूजा-अर्चा करणे चालू केले आहे.